औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचे उल्लू बनाविंग!  

160
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यात येईल, त्याप्रमाणे घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी, ८ जूनच्या सभेत करतील, अशी चर्चा शिवसेनेच्या नेत्यांनी घडवून आणली. प्रत्यक्षात बहुचर्चेत आलेल्या या सभेत मात्र शिवसेनेने निराशा केली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्क ‘आपण औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे तेव्हाच करणार, जेव्हा या शहराचा संभाजीराजेंच्या नावाला शोभेल असा विकास होईल, असे सांगत  त्याआधी या ठिकाणच्या विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे, तो आधी मंजूर करावा, असे शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा डावलला. यावर भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका करत या सभेच्या टीझरमध्ये नामांतराचा उल्लेख होता, प्रत्यक्षात त्यांनी विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा मांडत केंद्राकडे बोट दाखवले आहे. खरे तर शिवसेनेसाठी नामांतराचा विषय उरलेला नाही. दोन दिवसांनंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे, जर नामांतर केले तर एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या मतांचे काय होईल, ही चिंता मुख्यमंत्र्यांना वाटली म्हणून त्यांनी नामांतराचा विषय त्यांनी डावलला आहे, असेही दरेकर म्हणाले.

तरच संभाजीनगर नामकरण होईल! 

औरंगाबादच्या सभेत नामकरणाच्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधकांना सत्ता होती तेव्हा सुचले नाही आणि आता सत्ता गेल्यावर अंगात आले आहे. संभाजीनगर केव्हा करणार, अशी विचारणा हे विरोधक करत आहेत. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचे वचन हे माझ्या वडिलांचे होते. मात्र त्याआधी एक – दीड वर्षांपूर्वी विधानसभेत विमानतळाचे नाव संभाजीनगर करा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे, तो प्रस्ताव अजून का मंजूर झाला नाही, अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या शहराचे संभाजीनगर असे नामांतर मी तेव्हाच करेन, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेस या शहराचा मी विकास करेन, अन्यथा संभाजी राजे मला रायगडावरचे टकमक टोक दाखवतील, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामकरणाच्या विषयाला कलाटणी दिली.

नामांतर शहराचे नाही तर विमानतळाचे 

विशेष म्हणजे जेव्हापासून या सभेची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा विषय चर्चेत आणण्यात आला होता. स्वतः औरंगाबादमधील शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केले आहेच, त्याची घोषणा येथील सभेत  केली जाईल, असे म्हटले होते. तर सभेच्या आधी तासाभरापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबादचे संभाजीनगर केल्याचा प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवला आहे, तो आधी मंजूर करावा, असे सांगत राज्याने शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्रात पाठवल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र भाषणाच्या वेळी विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचे सांगत चंद्रकांत खैरे आणि संजय राऊत यांना खोट्यात पाडेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.