धाराशिव जिल्ह्यात जाहीर सभेसाठी जात असताना सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. औसा येथील हॅलिपॅडवर उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली. ही तपासणी सुरू असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा व्हिडीओ काढत तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. कर्मचाऱ्यांची नावे विचारत उद्धव ठाकरेंनी त्यांचीही चौकशी केली.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली, मालाडमध्ये अभूतपूर्व विकास होईल – केंद्रीय मंत्री Piyush Goyal)
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते. काल जालना येथे दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याला तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही बॅग तपासा, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.
वणी येथेही झाली होती बॅगांची तपासणी
११ नोव्हेंबर या दिवशी यवतमाळमधील वणी येथेही उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाली होती. या वेळीही उद्धव ठाकरे चांगलेच संतापले होते. त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओदेखील शूट केला होता. तसंच निवडणूक अधिकाऱ्याला तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही बॅग तपासा आणि व्हिडीओ शूट करुन मला पाठवा, असे वणी येथील कर्मचाऱ्यांना सांगितले होते.
निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार – अजित पवार
याविषयी अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, माझ्यापण बॅगा तपासल्या आहेत. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या गेल्या होत्या. निवडणूक आयोगाला तो पूर्ण अधिकार आहे. लोकसभेला मुख्यमंत्र्याच्या बॅगासुद्धा तपासल्या गेल्या होत्या. आमच्या सोबत पोलिसांच्या गाड्या असतील, तर त्याही तपासल्या पाहिजेत.
काय आहे निवडणूक आयोगाचा नियम ?
नेत्यांच्या बॅगा तपासण्याच्या संदर्भात काय नियम आहेत, याविषयी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकाऱ्यांशी हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. ते म्हणाले, “निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाला कोणतेही संशयित वाहन, बॅग तपासणीचा अधिकार आहे. तपासणी करताना कोण नेता, कुठल्या पक्षाचा आहे हे पाहिले जात नाही, जी काही कारवाई होते ती नियमानुसारच होते.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community