महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!, असे ट्विट शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
( हेही वाचा: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच शिवसेनेचे नेते नॉट रिचेबल! )
उद्धव ठाकरेंकडून शुभेच्छा
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गुरुवारी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community