भाजप लोकांचा उपयोग संपला की त्यांना सोडून देते. एखाद्याचा वापर संपला की त्याला किंमत त्या पक्षाकडून मिळत नाही. भाजपने टिळक कुटूंबियांवर अन्याय केला. त्यांचा फक्त वापर करून घेतला. पुण्यात गिरीश बापटांबद्दल तेच झाले आहे. बापटांचा वापर करून भाजपने त्यांना सोडले. ते आजारी असतानाही त्यांना प्रचारात उतरवणे पाशवी आहे. याबद्दल भाजपने विचार करायला हवा होता, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. ते चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ऑनलाईन प्रचारसभा घेतली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, टिळक कुटूंबियाचा वापर करून भाजपने त्यांना फेकून दिले आहे. बापटांना आजारी असतानाही प्रचारात उतरवले. त्यांचे डबल इंजिन नुसते धूर सोडते. आमच्या सोबत राहिले तर तांदळातले खडे आणि तुमच्यासोबत गेले तर धुतलेल्या तांदळासारखे? असा सवालही ठाकरे यांनी विचारला. धनुष्यबान चिन्ह, शिवसेना हे नाव चोरलं, याला लोकशाही मानत नाही, असेही ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा मोदींना हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा; राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरील आवाहनाचा फडणवीसांकडून समाचार )
Join Our WhatsApp Community