उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन करून दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना सांभाळून घेण्याची विनंती केली होती, असा खळबळजनक दावा माजी केंद्रीय मंत्री, भाजपा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला.
काय म्हणाले राणे?
उद्धव ठाकरे यांचे स्विय सहाय्यक आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मला फोन केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मला फोनवरून दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेला सांभाळून घेण्याची विनंती केली होती. तुम्हालाही 2 मुले आहेत. आदित्यला सांभाळून घ्या असे ते म्हणाले. त्यावर मी त्यांना तुमच्या मुलाला असे सायंकाळी 7 नंतर बाहेर पडू देऊ नका, असा सल्ला दिला, असे नारायण राणे ((Narayan Rane) म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आतापर्यंत अनेकदा आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलिनिर्देश करण्यात आला. नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनीही या प्रकरणी त्यांच्यावर टीका केली. विशेषतः या प्रकरणी एका बंद लिफाफ्यात विधानसभेच्या पटलावर काही पुरावेही सादर करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community