उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या बालेकिल्लात आव्हानाची भाषा; म्हणाले….

121

शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आणि सत्तांतरानंतर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे प्रथम गुरुवारी ठाण्यात गेले. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. याच बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी थेट बंड केलेल्या शिंदे गटाला आव्हान केलं आहे. लवकरात लवकर ठाण्यात एक प्रचंड मोठी जाहीर सभा घेऊन समाचार घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. जैन समाजाच्या मुनींचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे गुरुवारी ठाण्यात पोहोचले होते. त्यावेळी जैन बांधवांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरुनाखाली हे जे काही लांडगे घुसले गेले ते विकले गेले. यामुळे महाराष्ट्रासोबत शिवसेनेची बदनामी झाली आहे. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे, धगधगणारे शिवसैनिक शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि माझ्यासोबत राहिलेत. हे निखारेच उद्या महाराष्ट्रात मशाल पेटवणार आहेत. अन्यायावरती लाथ मारा हे तर शिवसैनिकांचं ब्रीद वाक्य आहेच. पण त्याचबरोबरीनं शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला शिकवलं की, ८० टक्के समाजसेवा २० टक्के राजकारण. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक ते इकडे आहेत. बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावानं विकले गेले हे काही सांगण्याची गरज नाही. लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीरसभा घेणार म्हणजे घेणारचं. आणि त्यावेळेला कोणाचा काय तो समाचार घ्यायचा आहे तो घेईन.’

(हेही वाचा – परभणी, पुण्यातील राष्ट्रवादीत पडणार मोठं भगदाड! आमदार, नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.