हिंमत असेल तर संपवून दाखवा; Uddhav Thackeray यांचे अमित शहांना आव्हान

180

काही दिवसांपूर्वी बाजारबुणगे इथे येऊन गेले. ते म्हणतात औरंगजेब संघटनेचे प्रमुख उद्धव ठाकरे. मी औरंगजेब तर तुम्ही कोण? तुम्ही तर अहमद शहा अब्दाली, अशी टीका ठाकरेंनी केली. काय नशीब आहे बघा, अमित शहा जिथे येऊन जातात नंतर तिथे मी येऊन यांना फटकारतो. अमित शहा म्हणतात उद्धव ठाकरेला संपवा. हिंमत असेल तर मैदानात या आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवून दाखवा, असा थेट इशाराच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 25 ते 30 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. तेव्हा शिवसेनेची कधी भाजपा झाली नाही, मग आता काय म्हणता शिवसेनेची काँग्रेस झाली? मला एकनाथ खडसेंचा फोन आला होता. तेव्हा जागावाटप अंतिम टप्प्यात आले होते. तेव्हा मला फोन करून सांगतात आपल्याला पुढे सोबत जाता येणार नाही, ही युती तोडावी लागेल. वरून तसे आदेश मिळाले आहेत. मी म्हणालो ठीक आहे आणि नंतर तुमच्या साक्षीने निवडणूक लढवून जिंकून दाखवले. भाजपचे हे हिंदुत्व नाही, हे थोतांड आहे. आम्हाला दळभद्री गोमूत्रधारी हिंदुत्व मान्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा Hassan Nasrallah च्या हत्येवर मेहबूबा मुफ्तींचे मगरीचे अश्रू; निवडणूक रणनीती की दु:ख?)

1500 रुपयांत लाडक्या बहिणीचे काय होते?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथल्या एका महिलेला विचारले कसे चालू आहे, त्यावर त्या म्हणाल्या 1500 रुपयात काय होते? 1500 रुपयांत घर पण चालत नाही. मुलांचे शिक्षण 1500 रुपयात होणार आहेत का? असे म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील टीका केली आहे. मोदी-शहांची आम्हाला भीक नको आहे, आम्ही हक्काचे मागत आहोत. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. पण तेव्हा मी अशा सभा घेत सगळ्यांना दाखवत नाही बसलो की मी कर्जमाफी केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांवर लगावला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.