उद्धव ठाकरे कोकणात मासे खायला येतात…; Narayan Rane यांची टीका

662
Narayan Rane : भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला (Konkan) काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठी कोकणात येतो, अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ( Narayan Rane)
(हेही वाचा – अभ्युदयनगरमध्ये किमान ६२० चौरस फुटाचे घर; CM Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत निर्णय)

नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg District) येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा, असं आपण हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे, त्यामुळेच ते उद्धव ठाकरे आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवायचे नाहीत, असं मी हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कोकणाला काही दिलं नाही. अडीच वर्षात त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पहा. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला (Sindhudurg District) किती पैसे दिले? त्यांना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार नाही. कोकणात येण्याचाही त्यांना अधिकार नाही, असेही नारायण राणे म्हणाले आहेत.

(हेही वाचा – एनआयएला तपासात पूर्ण सहकार्य करू; तहव्वुर राणाच्या चौकशी संदर्भात CM Devendra Fadnavis यांची ग्वाही)

इंडिगो विमान…
चिपी विमानतळाविषयी (Chippy Airport) बोलताना नारायण राणे म्हणाले, चिपी विमानतळावरुन आता इंडिगो विमान पण येणार आहे. आता चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढवावेत यासाठी माझा प्रयत्न आहे. तसेच मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) उभारण्यात येणाऱ्या 60 फूट उंचीचे पुतळ्याचे 1 मे रोजी अनावरण होणार असल्याची माहितीही नारायण राणे यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.