मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर शिंदे गटात शिवसेनेतून जोरदार इनकमिंग सुरू असतानाच ठाकरे गटानेही शिंदे गटाला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. बंजारा समाजाचे महंत सुनीव महाराज यांनी शुक्रवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. अशातच महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
दसरा मेळावा एकच
शिवसेनेचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण त्याचं उत्तर मिळण्याआधीच शिवसेना दहा पावलं पुढे गेली आहे. दसरा मेळावे सगळ्यांचेच होत असतात पण शिवसेनेचा दसरा मेळावा एकच आहे जो शिवतीर्थावर होणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
(हेही वाचाः ‘मी ट्रेनिंगला कधी येऊ? मोफत शिकवणार की फी घेणार?’, अजित दादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न)
एकाला शह देणं ही क्षुल्लक गोष्ट
शिंदे गटाचे मंत्री यवतमाळचे आमदार संजय राठोड यांना शह देण्यासाठी सुनिल महाराज यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मी कोणालाही शह देण्याचा विचार करत नाही. मला पुढे जायचं आहे. संपूर्ण समाज एकत्र आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला शह देणं ही फार क्षुल्लक गोष्ट असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे.
पोहरादेवीचं दर्शन घेणार
साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. त्यामुळे नवरात्रीमध्येच सुनिल महाराज यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यांच्यासोबत बंजारा समाजातील कडवट सैनिकही त्यांच्यासोबत आले आहेत. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. ते निष्ठेने पक्षात आले आहेत. त्यामुळे आता त्यांचं भवितव्य घडवण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे लवकरच मी पोहरादेवीचं दर्शन घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community