मला संपवायला आले आहात, महाराष्ट्र तुमचे राजकारण याच मातीत गाडेल; Uddhav Thackeray यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

165

४ जूननंतर तुम्ही पंतप्रधान राहणार नाही, तुम्ही केवळ मोदीच राहणार आहात, भाडोत्री फौज घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आले आहात. मला संपवण्याचा प्रयत्न करा, हा महाराष्ट्र तुमचे राजकारण याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. शुक्रवार, १७ मे रोजी महाविकास आघाडीची सभा वांद्रे येथील बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाचा समाचार घेतला.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी ‘तमाम हिंदू बांधवांनो’ म्हणणे सोडून दिले; Devendra Fadanvis यांची ठाकरेंवर बोचरी टीका )

मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे?

मुंबईत तुमच्या कंपन्या दादागिऱ्या करतात. मी सर्वच गुजरातींविरोधात नाही. गुजरातीसुद्धा आमचाच आहे. पण मोदींमुळे दोन-पाच मस्तवाल झालेत त्यांना वेळीच सुधरा. मराठी माणसाला प्रवेश दिला नाही तर तुमचे दरवाजे बंद करून तुम्हाला गुजरातला पाठवणार. मराठी, गुजरात, हिंदु, मुसलमान एकत्र राहतो. त्यात मिठाचा खडा टाकू नका, असे म्हणत (Uddhav Thackeray) नकली शिवसेना, नकली संतानवरूनही उद्धव ठाकरे यांनी मोदींचा समाचार घेतला. इकडे तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदीसमोर झुकणार नाही असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्यासोबत आले आहेत. मोदीजी इकडे सगळे मुंबईकर आहेत. हे मुंबईकर जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना मदत करायला घेऊन जातो तो शिवसैनिक जातो भाजपाचा कार्यकर्ता नाही जात कुठे? अशी टीका  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. “मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे? “दहा वर्ष ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना कायमचं तडीपार करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केला पाहिजे. मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत. एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जनता असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, हुकूमशहा याची नजर कशी असते? राक्षसी? अरे! पंतप्रधान म्हणून शेतकरी तुमच्याकडे कांद्याचा हमी भाव मागतोय. कांद्याला भाव मागतोय. निर्यात बंदी मागतोय. त्यांचे न ऐकता तुम्ही भारत माता की जय! भारत माता की जय! म्हणता. मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे?, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.