Uddhav Thackeray : आरोग्य यंत्रणेचे तीन – तेरा झाले आहे – उद्धव ठाकरे यांची टीका

219
Uddhav Thackeray : आरोग्य यंत्रणेचे तीन - तेरा झाले आहे - उद्धव ठाकरे यांची टीका

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि नागपूर येथे झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे तीन – तेरा झाले आहेत, अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज्यातील आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले असताना राज्यातील एक फुल दोन हाफ कुठे बसले आहेत? असा खडा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. यातील एक फुल आणि एक हाफ केंद्रात बैठकीला बसले आहेत. तर दुसरे हाफ कुठे गेले?

झालेल्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करा

नांदेडमध्ये २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर अशा ८ दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३८ बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दरमयान उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून या सरकारला घरी बसवलं पाहिजे तसेच या सगळ्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

जाहिराती करायला पैसे आहेत , राज्यातील रुग्णांचे जीव वाचवायला पैसे नाहीत

सध्या सरकारकडे स्वःताच्या जाहिराती करायला पैसे आहेत. मात्र, औषधं खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळेच रुग्णांचे बळी गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व सरकारी दलालांची चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

(हेही वाचा – Nanded : नांदेडमध्ये मृत्यूचे सत्र सुरूच; ४ दिवसांत ५० च्या वर मृत्यू)

आता त्याच डॉक्टरांना बदनाम केलं जात आहे

“जगभरात कोरोनाचं संकट असताना राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. तेव्हा मी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) होतो. आजही तोच महाराष्ट्र आहे. तीच आरोग्य यंत्रणा आहे. ज्या आरोग्य यंत्रणेने जग व्यापलेल्या संकटाचा यशस्वीपणे सामना केला त्याची आज सरकार बदलल्यानंतर दुर्दशा झाली आहे. कोरोनाच्या काळात मुंबई, महाराष्ट्रात याच डॉक्टर, वॉर्ड बॉय, नर्स यांनी जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली. मात्र आता त्याच डॉक्टरांना बदनाम केलं जात आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.