शिवसेनेचे नाव, चिन्ह गुलामांना दिले, मोगॅंबो खूश हुआ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

125

काल कुणी तरी पुण्यात आले. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गुलामांना दिले. मोगॅंबो खूश हुवा. मिस्टर इंडीयातील मोगॅंबोंना फूट पाडायची होती. ती आताच्या मोगॅंबोंनीही पाडली. मुंबईला वाचवणारे माझ्यासोबत आहे. तुम्हारी छपन्न इंच का सिना कहाॅं है, तो पसीना था. आम्ही भाजपला नाही भाजपने आम्हाला सोडले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबईत आज उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेत मार्गदर्शन केले. त्यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. धनुष्यबाण गोठवला मी मशाल घेतली. पण नीच आणि घाणेरडे राजकारण सध्या सुरू आहे. ते मशालही हिसकावून घेऊ शकतात. माझा धनुष्यबाण ते चोरू शकता पण हृदयातील ‘राम’ चोरू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, मी रस्त्यावर उतरून आव्हान दिले. माझे चोरलेले धनुष्यबाण घेवून समोर या मी माझी मशाल घेवून येतो ही मी त्यांना आव्हान दिले आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे विरोधक होते. पण मी आज सांगतो मी भाजपला सोडले हिंदुत्वाला नाही. त्यांचे हिंदुत्व मला मंजूर नाही. माझ्या वडीलांनी जे हिंदुत्व सांगितले ते भाजपसारखे नाही. राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप म्हणजे हिंदुत्व नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. मी आजही धनुष्यबाण चोरणाऱ्यांना आव्हान देतो. आज गळ्यात पट्टा बांधून काही लोक अमित शहांसोबत गेले आहे. हे माझ्या वडीलांना मंजूर नव्हते. आम्ही देऊ तेच मंत्रालय देऊ अशी त्यांची भाषा. आमच्या पोस्टरवर मोदींचा चेहरा होता पण त्यांच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो होता. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात यायचे तेव्हा ते बाळासाहेबांचा मुखवटा घालून येतात. देशाला मजबूत बनवणे हे स्वप्न होते. ज्यांना आम्ही दिल्लीत बसवले ते मजबूत झाले पण देश कमकुवत होत आहे. काही लोक खूप ढोंगी आहेत त्यांना मी कुत्रा म्हणणार नाही कारण तो इमानदार असतो. म्हणून मी हा शब्द वापरत नाही. पण कोल्हा, लांडगा ढोंगी शब्द वापरतो. बाळासाहेबांनी प्रमोद महाजन यांना सांगितले होते की, हिंदु म्हणून सर्वजण मतदान करतील. तो दिवस माझ्या वडीलांनी भाजपला दाखवला. आज हिंदु जागले आहेत पण त्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. हिजाब, गोवंश हे मुद्दे फक्त निवडणुकीत भाजप वापरत आहे. हिंदु आक्रोश मोर्चा मागे काढला. देशाचे पंतप्रधान हिंदु, देशात हिंदु सरकार मग आक्रोश का…?, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.