वापरा आणि फेका हीच भाजपाची निती राहिली आहे. कसब्यात टिळकांच्या घराण्याला आणि गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपाने टाकले. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे, अशी घणाघाती उद्धव ठाकरे केली.
मविआच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना लोक आता वेगळा विचार करू शकतात हे या निकालावरुन समोर आले आहे. भाजपाची नीती नेहमीच वापरा आणि फेका अशीच राहिली आहे, हे मी कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हाही म्हटले होते. कसब्यात टिळकांच्या घराण्याला उमेदवारी दिली नाही. भाजपाने टिळकांच्या घराण्याला टाकले. तर गिरीश बापट यांची तब्येत ठिक नसतानाही त्यांना प्रचाराला उतरवले. गोव्यातही मनोहर पर्रिकरांबाबत तेच केले गेले. पण त्यांच्या पश्चात मुलाला भाजपाने बाजूला केले. भाजपा विरोधातील मते आता एकत्र करण्याची गरजकसब्याच्या निकालाने लोक वेगळा विचार करू शकतात हे दाखवून दिले आहे. चिंचवडमध्येही भाजपा विरोधातील मते पाहिले तर तिथेही आज भाजपाविरोधात निकाल लागला असता. भाजपा विरोधातील मतांना एकत्र कसे करता येईल हाच मोठा प्रश्न आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा आंध्र प्रदेश सरकार ३ हजार मंदिरे बांधणार; श्री तिरुपती देवस्थान प्रत्येक मंदिराला १० लाख रुपये देणार)
Join Our WhatsApp Community