महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बसवराज बोम्मई यांच्या ट्वीटबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली, तेव्हा ते ट्वीटर अकाऊंट आपले नसून फेक असल्याचे बोम्मई बैठकीत म्हणाल्याचे समोर आले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. ’15-20 दिवस हा प्रश्न चिघळला, मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅक झाले, खुलासा करायला इतके दिवस का लागले. अटका प्रत्यक्ष करण्यात आल्या, महाराष्ट्रातल्या वाहनांना प्रत्यक्ष बंदी झाली. हे ट्वीटरवर झाले नव्हते. मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे. हा खुलासा दिल्लीत बैठक बोलवेपर्यंत का थांबला होता?’, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मग फक्त महाराष्ट्रानेच थांबायचे का?
सर्वोच्च न्यायालयात प्रश्न प्रलंबित असताना दोन्ही राज्यांनी काही करू नये, हा काही नवीन सल्ला नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रश्न प्रलंबित असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला, विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रानेच थांबायचे का? या गोष्टींचा नुसता उहापोह करून पोहे खाऊन निघणार असतील तर त्याला काही अर्थ नाही. कालच्या बैठकीत नवीन काय झाले?,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून झालेल्या महापुरुषांच्या अपमानाविरोधात मुंबईत 17 डिसेंबरला महाविकासआघाडीच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी महाविकासआघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )
Join Our WhatsApp Community