ठाकरे कुटुंबाचे आणि ठाकरे गटाचे काही अतिशय आवडते शब्द आणि संवाद आहे. मर्द, खंजीर, कोथळा, मी नामर्दाची औलाद नाही वगैरे वगैरे…यासोबतच भाजपावर टीका करताना ते नेहमी म्हणतात, “आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही.” हा संवाद जणू ठाकरे गटाचा तकीया कलाम झालेला आहे.
आता या संवादाचा सर्वसाधारण अर्थ “स्पृश्य, अस्पृश्यता व जाती भेद न मानणारे, अंधश्रद्धा न मानणारे विज्ञानवादी हिंदू आहोत.” याचा दुसरा अर्थ आम्ही ब्राह्मणवाद मानत नाही कारण ब्राह्मणांनीच सगळ्या समस्या निर्माण केल्यात. त्यामुळे आम्ही ब्राह्मण विरोधी आहोत.” आता ठाकरेंना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे याची स्पष्टता त्यांनी आजपर्यंत दिलेली नाही. ठाकरेंच्या राजकारणाची समस्या अशी आहे की त्यांच्याकडे स्पष्टता नाही, त्यांची स्वतःची तत्वे नाहीत. म्हणूनच त्यांना महाविकासआघाडीमध्ये नवा संसार थाटताना फारशी अडचण आली नाही.
या आणि अशा कारणांमुळे “आम्हाला शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही” किंवा “आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही.” या वाक्याचा अर्थ ठाकरेंनाही कळलेला नाही. ठाकरे, राऊत आणि त्यांचे चाहते हे वाक्य सहज बोलून जातात. पण आजपर्यंत मला याचा अर्थ कुणी सांगू शकलेला नाही. मुळात जसा राजा तशी प्रजा या अर्थाने त्यांचे चाहते वागत असतात. तुम्ही ठाकरे गटाच्या लोकांशी वाद विवाद कराल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की या लोकांचे विशिष्ट असे तत्व नाही. साहेब बोलतील ती पूर्वदिशा असा कारभार त्यांच्याकडे चालतो. मात्र यामुळे उद्धव ठाकरे यांनी कै. बाळासाहेब यांचे तत्व मातीमोल केले आहे.
त्यामुळे ठाकरे हे राईट विंगचे सुद्धा नाहीत आणि लेफ्ट विंगचे सुदधा नाही. ते मधल्या मध्ये लटकत राहिले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता प्रश्न विचारणार आहे, “शेंडी जानव्याचे हिंदुत्व म्हणजे काय रे भाऊ?”
Join Our WhatsApp Community