मुख्यमंत्र्यांनी हिरवा रंग धारण केला! किरीट सोमय्यांचा आरोप

ठाकरे सरकराने नवीन इतिहास रचला आहे. घोटाळेबाजांना नाही तर घोटाळे उघडकीस करणाऱ्यांना अटक केली, असे किरीट सोमय्या म्हणाले.

आपण कराडला पोहचल्यावर कराडला पोलिसांनी आपल्याला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवला मात्र कुठेच मला मुंबई बाहेर जाऊ देऊ नये, असे म्हटले नव्हते, तर मग मुंबईत मला कोल्ह्यापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटा आदेश का दाखवला? पोलिस खोटारडे आदेश दाखवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल, तर खुशाल करा, पण आम्हाला गणेश विसर्जनाला जाऊ न देणे, कोल्ह्यापुरात अंबामातेचे दर्शन करू न देणे, हा माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. याविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार आहोत, त्यात मुंबईत खोटा आदेश काढणारा पोलिस अधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार आहे, असे भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले.

नाट्याला पावित्र्य आहे, कालपासून नाट्य सुरु आहे, ते राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, लोकांच्या मनात संभ्रम निर्मण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काल जी कारवाई झाली ती गृहमंत्र्यांनी केली आहे, ती आकसापोटी केली नाही. त्यात मुख्यमंत्र्यांवर दोष देण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार वर खोटे आरोप केले तर सरकारला भोकं पडत नाही, किरीट सोमय्याची सगळी नौटंकी ही केंद्र सरकार च्या इशा-यावर सुरू आहे ते बिनबुडाचे खोटे आरोप करत सुटले आहे.
– संजय राऊत, शिवसेना नेते.

ठाकरे सरकारने नवीन इतिहास रचला

हसन मुश्रिफ यांच्यामुळे मला अंबामातेचे दर्शन घेता आले नाही, ठाकरे सरकारने नवीन इतिहास रचला आहे. घोटाळेबाजांना नाही तर घोटाळे उघडकीस करणाऱ्यांना अटक केली. हसन मुश्रीफ यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी आधी कागल पोलिस ठाण्यात तक्रार होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण २७०० पानांच्या घोटाळ्याचे कागदपत्रे घेऊन कोल्हापूरला निघालो होतो. मात्र तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे, असा किरीट सोमय्या यांनी केला.

(हेही वाचा : आता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना : मुश्रिफांच्या जावयाचा १०० कोटींचा घोटाळा!)

घरात कोंडून ठेवण्यात आले!

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्याला गणेश विसर्जनापासून वंचित ठेवण्यात आले, घरात कोंडून ठेवण्यात आले. मी आणि माझा वकील यांनी आदेश दाखवण्याची विनंती केली, पण शेवटी आम्ही कोर्टात गेल्यावर मला सोडण्यात आले. मी चौपाटी गेलो, पुढे कोल्हापुरात येण्यासाठी सीएसएमटी रेल्वेस्थानकात अडवले. महालक्ष्मी एक्स्प्रेस मिळणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी मला मुंबई बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे कराड जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे, असे म्हटले. मला मुंबई बाहेर पडू देऊ नये, असे म्हटले. मी त्या आदेशाला आव्हान देणार म्हटल्यावर पोलिस पळून गेले, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here