एकनाथ शिंदे यांना छळले, जेवढे त्यांनी सहन केले तेवढे मी सहन केले नसते. या लोकांनी पैसा घ्यायचा आणि पुठ्ठयाची खोकी फेकायला एकनाथ शिंदेंना दिली. बाळासाहेबांची शिवसेना आता उभे राहणे शक्य नाही. अजून आम्ही हिंदुत्व सोडले नाही. मुख्यमंत्री बनताना हिंदुत्व सोडून दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही गेलात, मुख्यमंत्री पदासाठी लाचार झालात. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे शरद पवारांच्या घरी जाऊन जे बोलले तो एकनाथ शिंदेंच्या बाबत दगाफटका होता. कारण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव तेव्हाच जाहीर झाले होते, तेव्हा रात्रीच शरद पवारांना भेटून उद्धव ठाकरे यांनी ‘माझे नाव जाहीर करा’, असे म्हटले, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.
संजय राऊतांना लाज का वाटत नाही
उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे कुणाच्या घरी गेले होते का? आता शाखा-शाखांत फिरत आहे. त्यावेळी पैसे देऊन माणसे आणत आहेत. बाळासाहेबांच्या सभा म्हटल्यावर लोकांची झुंबड उडायची. उद्धव ठाकरे काय मुलाखत देत आहेत. त्यांची कोण घेतो मुलाखत, तर संजय राऊत. लोकप्रभामध्ये असताना संजय राऊतांनी बाळासाहेबांवर प्रचंड टीका केली. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद घालवले आणि आता मुलाखत घेत आहेत. संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे. प्रश्न ही माझे आणि उत्तरही माझे. संजय राऊत हे बनावट पत्रकार आहेत.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना नुसता त्रास दिला, एक दिवस महाराष्ट्राला सगळे सांगेन! नारायण राणेंचा इशारा)
आदित्य ठाकरेंनी तोंड बंद करावे
खोबरे गेले करवंटी हातात आली, आता तरी शहाणे व्हा. विचारांची लढाई असेल तर कर्तृत्वाने लढून दाखवा, रडून काही होणार नाही. वर्षावरून मातोश्रीत येताना आदित्य ठाकरे व्हिक्ट्री साइन दाखवत होते. मुख्यमंत्री गेले याला विजय म्हणत होते. आदित्य आमच्या समोर वाढला आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर टीका करावीशी वाटत नाही. त्यामुळे आम्ही ज्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य वेचले त्यांना गद्दार म्हणू नये, तोंड बंद करावे, आदित्य ठाकरे यांना अजून महाराष्ट्र कळला नाही. सगळ्या खात्याचे निर्णय आदित्य ठाकरे घेत होते, आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचे काय कळते? फक्त सबबी सांगून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न म्हणजे ही मुलाखत आहे.
शिवसैनिक श्रद्धास्थान म्हणून बाळासाहेबांचा फोटो वापरतात
बाळासाहेबनानी जगभर कीर्ती पसरवली आज उद्धव ठाकरेने ती शिवसेना मातोश्रीपर्यंत आणून ठेवली. शिवसेना आणि ठाकरे हे नाते अतूट आहे म्हणतात आम्ही कुठे काय म्हणतो जपत रहा नातेसंबंध. एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक म्हणून खरे नटे जपले. आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचा फोटो तुमचे वडील म्हणून नाही तर आमचे श्रद्धास्थान म्हणून फोटो लावत आहोत. उद्धव ठाकरे नुसते स्मारक स्मारक करत आहेत. स्मारकाच्या नावाखाली फुकटचा महापौर बंगला बळकावला आहे. आता आम्ही गप्प बसणार नाही, सुशांत सिंग, दिशा सालियन सगळे आम्ही बाहेर काढणार. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र, मराठी माणूस आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केली आहे.
Join Our WhatsApp Community