खासदारकीचे तिकीट न मिळाल्याने जळगाव विद्यमान खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांनी उबाठा गटात प्रवेश केला आहे. उन्मेष पाटील यांच्या उबाठा प्रवेशावर भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष, इथं कुणी राहिल्याने कोणाला फरक फरक पडत नाही”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला. (Unmesh Patil)
(हेही वाचा – Lok Sabha Election : गौरव वल्लभ भाजपावासी, काँग्रेसवर सनातन विरोधी असल्याचा आरोप)
पाटलांची उबाठा गटात जाण्याची घाई ?
उन्मेष पाटील यांच्या तिकिटाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा (Parliamentary Board) होता. भाजपमध्ये आल्यावर त्यांना आमदारकी, खासदारकी आम्ही दिली होती. त्यांनी जाण्याची घाई केली.उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली स्वतःची कबर स्वतः खोदली आहे. महायुतीत असताना आमच्याशी गदारी केली. तुम्ही,अल्पशा सुखासाठी दुःखात गेला आहात. तुम्ही तुमची कबर स्वतःच खोदली आहे. तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोट आहे, असे आवाहन महाजन यांनी उन्मेष पाटलांना दिले आहे. (Unmesh Patil)
(हेही वाचा – Sanjay Nirupam : काँग्रेसमध्ये ५ सत्ताकेंद्रे जे एकमेकांशी भांडतात; संजय निरुपम यांचा घणाघात)
उन्मेष पाटील यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेच
पुढे गिरीश महाजन म्हणाले, “उन्मेष पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हटले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चांडाळ चौकडीने घेरले आहे. पाटील यांनी पक्ष सोडल्यामुळे आता ते काहीही टीका करू शकतात. त्यांना तिकीट नाकारण्याची सर्व कारणे केंद्रीय नेतृत्वाला माहीत आहेत. त्यांना मी वेळोवेळी समज देखील दिली होती. उन्मेष पाटील यांनी आपल्या सर्व चुकांवर आत्मपरीक्षण केलं पाहिजे असे विधान भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले. (Unmesh Patil)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community