उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच लिफ्ट मधून प्रवास केल्याची चर्चा पावसाळी अधिवेशनात दिवसभर होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्याने अडकले आहेत. त्यामुळे त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
(हेही वाचा – आणीबाणी देशाच्या लोकशाहीवर हल्लाच होता; President Droupadi Murmu यांचे संसदेच्या संयुक्त बैठकीत वक्तव्य)
एक चेहरे में कहीं चेहरे लगा लेते हैं लोग
एक चेहरे में कहीं चेहरे लगा लेते हैं लोग. काही महिन्यांतच त्यांचा असली चेहरा जनतेसमोर येईल, असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा महाराष्ट्रातील पंचतारांकित शेती चांगली नाही का, शेतकऱ्यांनी पंचतारांकित शेती करूच नाही का?, असा प्रति प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला.
आम्ही शेताच्या बांधावर जाणारे लोक आहोत. शेतकऱ्यांशी संवाद साधणारे आहोत, त्यांनी बांद्राच्या बाहेर निघून बांधा कधी पाहिला आहेत का ? त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय कळेल ? त्यासाठी इर्शाळवाडी सारख्या ठिकाणी जावे लागते. येथे वर्क फॉर्म चालत नाही. त्यासाठी सर्वांची कामे करावी लागतात, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community