मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी Uddhav Thackeray यांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले.,.

35

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून, मुंबई विकणाऱ्यांना रोखण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने लढेल, असे स्पष्ट केले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते. या वेळी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, सुनील प्रभू, सुभाष देसाई, सूरज चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

महापालिकेच्या खासगीकरणाचा आरोप

ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले की, “२०१२ मध्ये महापालिकेची मुदत ठेव ९२ हजार कोटी रुपये होती, पण आता ती ८० हजार कोटींवर आली आहे. महापालिकेची कर्जे तब्बल २.३० लाख कोटींवर पोहोचली असून, पुढील २३ वर्षे ही कर्जे फेडावी लागणार आहेत.”

त्यांनी सरकारवर आरोप करत सांगितले की, “मुंबईच्या सार्वजनिक मालमत्तेचे खाजगीकरण सुरू असून, उद्या महापालिकाही अदाणी समूहाला दिली जाईल.”

(हेही वाचा Bangladesh infiltrators: चेंबूर माहुल गाव येथून 7 अवैध बांगलादेशींना अटक)

संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा

खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर टीका करत म्हटले, “काही लोकांना भाड्याने मनगट घ्यावे लागते. प्रयागराज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण कपडे घालून गंगा स्नान केले आणि बुलेटप्रूफ जॅकेट घातले. हा केवळ दिखावा आहे.”

कार्यक्रमात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत “उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” असा नारा दिला. शिवसेनेचा हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत यावेळी ठाकरे यांनी दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.