‘मला दुःख झालं आहे’, मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला संवाद

111

गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झालेल्या उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला. शुक्रवारी शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी नवीन सरकारवर निशाणा साधला आहे. मेट्रोचे कारशेड आरेतच करण्याचा विचार नवे शिंदे सरकार करत आहेत, याचे मला दुःख होत असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजुरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. हा निर्णय मुख्यमंत्रीपदावर येताच एकनाथ शिंदे यांनी बदलत कारशेड आरेतच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा)

माझा राग मुंबईवर नको

आज पहिल्यांदा माझा चेहरा पडला आहे, कारण आज मला दुःख झालं आहे. माझ्यावर राग आहे ना मग माझ्यावर काढा पण तो मुंबईवर काढू नका. पर्यावरणासाठी आवश्यक जी वनराई आरेमध्ये होती, त्याठिकाणी फडणवीस सरकारकडून एका रात्रीत झाडांची कत्तल करण्यात आली. मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात आधी मी त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मुंबईच्या विकासाच्या आड येण्याचा माझा विचार नव्हता, कांजुरमार्गचा पर्याय मी त्यावेळी सुचवला. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की ,आरेत कारशेड करण्याचा निर्णय आपण रेटू नका. माझा राग मुंबईवर काढू नका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे केली आहे.

मुंबईकरांच्या हितासाठी निर्णय घ्या

कांजुरमार्ग मध्ये कारशेड करण्याच्या निर्णयात कुठलाही अहंभाव नाही. आता केंद्रात आणि राज्यात तुमचंच सरकार आहे. ती जमीन महाराष्ट्राची आहे. त्याठिकाणी कारशेड झाली तर मेट्रो अंबरनाथ, बदलापूर पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांच्या साठी हितासाठी हा निर्णय बदलू नये, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

(हेही वाचाः संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.