२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Shri Ram Mandir) करण्यात करण्यात येणार आहे. हा सोहळा केवळ अयोध्येतच नाही तर अवघ्या देशात आणि विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अयोध्येतील या सोहळ्यात प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी देशभरातून ७ हजार प्रमुख अतिथींना आमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणावरूनही राजकारण झाल्याचे पहायला मिळाले. या सोहळ्याचे निमंत्रण उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना शनिवार, २० जानेवारीला देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे अयोध्येतील सोहळ्याला जाणार का?
२२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Shri Ram Mandir) सोहळ्याच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील काळा राम मंदिर येथे जाऊन पूजा आणि महाआरती करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान त्याआधीच शनिवारी उद्धव ठाकरे यांना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे (Ayodhya Shri Ram Mandir) निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. कुरिअरद्वारे उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे निमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून अयोध्येतील सोहळ्याला जाणार की, आपला कुणी प्रतिनिधी पाठवणार की, इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांप्रमाणे हे निमंत्रण नाकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Join Our WhatsApp Community