निवडणुकीची (Maharashtra Election 2024) रणधुमाळी बघितली, तर उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) तोल गेलेला आपल्याला बघायला मिळतो. वाटेल ते बडबडायचे, वाटेल ते आरोप करायचे. देवा भाऊ काय? जॉकेटवाला भाऊ काय? दाढीवाला भाऊ काय? तुम्हाला शोभत का हे? मग तुम्हाला कडका भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? तुमच्या मुलाला लफडेवाला भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी. हे अशोभनीय आहे, असं म्हणेन मी. खरेतर याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्यांना जेलमध्ये टाकायला हवे होता, असे माझे प्रामाणिक मत आहे, असे उद्गार शिवसेना (Shiv Sena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काढले आहेत. ते रत्नागिरी येथील पत्रकारांशी चर्चा करत होते.
(हेही वाचा – Karnataka News : कर्नाटकातील नक्षलविरोधी दलाला मोठे यश, नक्षलवादी कमांडर विक्रम गौडा ठार)
उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही?
या वेळी उद्धव ठाकरे यांच्या भाषणांच्या घसरलेल्या दर्जांविषयीही ते बोलले. रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा तोल आता एवढा खाली गेला आहे की, ते काहीही बडबडत आहेत. ते पंतप्रधानांना वाटेल ते बोलतात, अमित शहांना वाटेल ते बोलतात, मुख्यमंत्र्यांनाही वाटेल ते बोलतात. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले होते की, मी असतो तर कानाखाली मारली असती, तेव्हा त्यांना जेवणावरून उचलून आत टाकले होते. मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा प्रश्न शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी चर्चा करत होते. बोलत होते.
बाळासाहेबांच्या नखाचीही सर नाही
कदम (Ramdas Kadam) म्हणाले, ते मुख्यमंत्र्यांनाच म्हणतात, बूट चाटायला जातो, हा अमुक चाटतो, तमुक चाटतो. इतक्या खालच्या पातळीवरती जो माणूस जाऊन बोलतोय, त्यांचा तोल गेलेले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलणे, म्हणजे हा राज्याचा अवमान आहे, महाराष्ट्र जनतेचा अवमान आहे. हे काही बिहार नाही ना? हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची (Bal Thackeray) स्टाईल मारायला जात आहेत. आता मी बघितले की, हातामध्ये रुद्राक्ष बांधलेत काय, जणू काही मी बाळासाहेब आहेत? अरे बाळासाहेबांच्या नखाचीही आपल्याला सर येणार नाही. कुठे बाळासाहेब आणि कुठे तुम्ही आहात? बाळासाहेब शब्दाला पक्के होते, तुम्ही तर बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करत आहात.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community