- प्रतिनिधी
राजकीय नेत्यांकडून पोलिसांना नेहमी लक्ष केले जाते, कुठल्या न कुठल्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. बीकेसी येथे नुकत्याच झालेल्या मविआ सभेच्या दिवशी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. क्षुल्लक कारणावरून उद्धव ठाकरे यांनी बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्याला लक्ष्य करून ‘त्याचे नाव लिहून घ्या रे ‘असे बोलून एक प्रकारे त्यांना बघून घेण्याची धमकी दिल्याचे एका व्हायरल व्हिडीओ वरून समोर आले. खुद्द उद्धव ठाकरे यांनी लक्ष केल्यामुळे बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. परंतु माजी मुख्यमंत्री आणि एका बड्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी क्षुल्लक कारणावरून पोलिसांना लक्ष करणे हे चुकीचे असल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे.
(हेही वाचा – मविआ म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी… ; पंतप्रधान Narendra Modi यांची अकोल्यात मविआवर टीका)
वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदानावर ५ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. राजकीय नेत्यांना व्यासपीठावर जाण्यासाठी असलेल्या मार्गावर मेटल डिटेक्स्टर बसविण्यात आले होते. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वसामान्यांना त्या मार्गातून प्रवेश नसल्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांकडून सभेला हजर येणाऱ्यांना दुसऱ्या मार्गाने जाण्यासाठी सांगितले जात होते. त्या मार्गाने केवळ बड्या राजकीय नेत्यांना प्रवेश असल्यामुळे पोलिसांकडून सामान्य कार्यकर्त्यांना त्या मार्गाने प्रवेश नाकरला जात असताना सभेसाठी हजर राहण्यासाठी शिवसेना उबाठाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच आदित्य ठाकरे आपल्या फौजफाट्यासह आले. दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना आता सोडण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांचे सुरक्षा गार्ड देखील या गराड्यात अडकले गेले. गार्ड यांना आत सोडले जात नसल्याचा गैरसमजातून उद्धव ठाकरे हे संतापले आणि त्यांनी आपला संताप बंदोबस्तावरील पोलिसांवर काढत ‘कोण आहे रे तो, त्याचे नाव लिहून घ्या रे’ असे बोलून बंदोबस्तावरील पोलिसांना लक्ष करण्यात आले.
(हेही वाचा – Suryakumar Yadav : टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने शेफ बनून केलं व्यक्ष आणि रमणदीप सिंग यांचं संघात स्वागत)
दरम्यान इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची समजूत काढत ‘साहेब आम्ही बघून घेतो, तुम्ही व्यासपीठावर जा’, असे बोलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना व्यासपीठापर्यंत सोडले. परंतु उद्धव ठाकरे यांच्या या कृतीमुळे बंदोबस्तावरील पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आणि ज्या अधिकाऱ्याचे नाव घेण्यात आले तो अधिकारी घाबरला, इतर सहकाऱ्यांनी त्याला धीर देत तेथून त्याला एका ठिकाणी बसविण्यात आले. हा सर्व प्रकार कोणीतरी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करून तो समाजमाध्यामावर व्हायरल केला. जो व्यक्ती एका राजकीय पक्षांचा अध्यक्ष आहे, तसेच राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना या प्रकारे बोलून संपूर्ण पोलीस खात्याचे खच्चीकरण केल्यासारखे असल्याची चर्चा पोलीस खात्यात होत आहे. राजकीय नेत्यांकडून पोलिसांना देण्यात येणाऱ्या अशा वागणुकीमुळे खादीच्या गर्दीत खाकीचा जीव गुदमरतोय असे ही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community