राज्यात मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तणावाच्या परिस्थितीवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना झालेल्या अटकेनंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. सरकार एका महिलेला इतके घाबरले की, त्यांनी गुंड पाठवले. राज्यात सध्या झुंडशाहीचे सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी झुंडशाही सरु आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रपती राजवटीवर फडणवीसांचे मोठे विधान
पुण्यात मीडियाशी संवाद साधताना, देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असेल. मात्र, राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनेतच्या मनातही हीच भावना आहे. भाजपा ही संघर्ष करणारी पार्टी आहे. आम्ही अशी मागणी करण्याचे काहीच कारण नाही. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राज्यपाल घेतात. आम्ही लढायला तयार आहोत. असे फडणवीस यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: दोन दगडं मारली असतील, तर भाजपाला दु:ख वाटण्याचे कारण काय ? राऊतांनी सोमय्यांवरील हल्ल्याचे केले समर्थन )
हे झुंडशाहीचे सरकार
शनिवारी मुंबईत घडलेली घटना ही मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. झेड सिक्युरिटीमधील व्यक्ती तिथे येतात. ते सांगतात की बाहेर 70 ते 80 गुंड आहेत. तरीही पोलिसांच्या उपस्थितीतच झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो. एकतर पोलिसांचे या हल्ल्याला समर्थन होते किंवा ते इतके नाकाम झाले आहेत की, त्यांना दबावामुळे काहीच करता येत नाही हे सिद्ध होईल. पोलिसांसमोर दगड मारले जाणार असतील, तर मग अशाप्रकारचे झुंडशाही सरकार मी पाहिलेले नाही, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community