ठाकरे गटाला आणखी एक धक्का; नाशिकमधील आमदारांसह, नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश

133

उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख तथा संजय राऊत यांचे अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या भाऊ चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मागच्या आठवड्यात संजय राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून दौ-यात सहभागी असलेल्या भाऊ चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आता यातच नाशिकमधील माजी मंत्री आणि माजी आमदार यांच्यासह माजी नगरसेवक असे एकूण पाच जण शिंदे गटात जाण्यासाठी तयारी करत आहेत. मुंबई किंवा नाशिकमध्ये प्रवेश सोहळा करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा: फेसबूक पोस्ट करत दिला राजीनामा ; ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश )

मागील आठवड्यात 13 नगरसेवकांनी शिंदे गटात केला प्रवेश 

शिंदे गटात होणा-या या नव्या प्रवेशामुळे शिर्डीसह, नाशिक रोड- देवळाली, नाशिक पश्चिम या मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा फटका बसणार असल्याने होणारे हे प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. मागील आठवड्यात 13 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यात संपर्कप्रमुख आणि ग्रामीण जिल्हाप्रमुख यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला गळती लागल्याचे बघायला मिळत आहे. आता माजी मंत्री, माजी आमदार आणि माजी नगरसेवक यांचा प्रवेश सोहळा कधी आणि कुठे होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.