जेव्हापासून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली, तेव्हापासून भाजपचे नेते निलेश राणे यांचे दररोज उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे ट्विट येत आहेत. दसऱ्याच्या दिवशीही निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे, त्यात चक्क त्यांनी ‘चलो शिवाजी पार्क’, असे म्हटले आहे. मात्र त्यासोबत त्यांनी जो फोटो ट्विट केला आहे, त्यावरून जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
चलो शिवाजी पार्क… pic.twitter.com/jM8lOSnKqe
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 5, 2022
काय उद्देश आहे निलेश राणेंच्या ट्विटचा?
दसऱ्याच्या दिवशी अवघ्या देशाचे मुंबईकडे लक्ष लागले आहे. इथे शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. त्यातील का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानात होणार आहे, तर उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्क येथे होत आहे. दोन्ही गट आमच्याकडेच निष्ठावान शिवसैनिकांची गर्दी होणार आहे, असा दावा केला जात आहे. मात्र दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार अशी चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माळव्याविषयी बॅनरही लावले होते. आता निलेश राणे यांनी एक फोटो ट्विट करत, एक चालक फेटा राष्ट्रवादीच्या घातलेला आहे, मात्र फोनवरील कव्हर मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे, असा हा फोटो असून या फोटो कॅप्शन म्हणून ‘चालो शिवाजी पार्क’ असे म्हटले आहे. यावरून शिवाजी पार्काच्या सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे, असे सांगण्याचा प्रयत्न निलेश राणे यांनी केला आहे.
(हेही वाचा Dasara Melava 2022: दसरा मेळाव्यात सीमोल्लंघन! २ खासदारांसह ५ आमदारांचा शिंदे गटात प्रवेश)
Join Our WhatsApp Community