ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून सुषमा अंधारेंनी म्हटले ‘बिस्मिल्ला ए रेहमान ए रहीम…’  

उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली, तेव्हापासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, यामुळे एकनाथ शिंदे यांनी २०२२मध्ये ४० आमदार फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णतः पुरोगामी होण्याच्या मार्गावर आहे. कारण उद्धव गटाने उपनेतेपद बहाल केलेल्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या व्यासपीठावर थेट इस्लामचा प्रचार केला, त्यासाठी चक्क ‘बिस्मिल्ला ए रेहमान ए रहीम…’ हा आयात म्हटला.

सोशल मीडियावर टीकेची झोड 

सध्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत, नव्याने पक्षाची भूमिका काय आहे, हे समजावत आहेत. त्यावेळी त्या शाहू, फुले, आंबडेकर यांच्या विचारांना प्राधान्य देत असताना वीर सावरकर, हिंदुत्व हे विषय तुच्छ लेखत आहेत. बाळासाहेबांनी कधीच मुस्लिमांचा द्वेष केला नाही, असेही सांगत आहेत. आता तर सुषमा अंधारे यांनी थेट व्यासपीठावरून ‘बिस्मिल्ला ए रेहमान ए रहीम…’ हा आयात अगदी मौलानाच्या आवाजात म्हणून दाखवला आणि त्यांचा अर्थही विस्तृतपणे सांगताना इस्लाममधील ५ फर्ज काय हे सांगितले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट हा लक्ष्य बनत आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, ‘ही ज्वलंत हिंदुत्वाचा वसा सांगणाऱ्या जनाब सेनेची सभा चालली आहे…अस्सलाम वालेकुम लाचारांनो…’  असे म्हणाले. तर काही जणांनी ‘ शिवसेनेच्या व्यासपीठा वरून इस्लाम चा प्रचार ….बाळासाहेबांचा प्राण तळमळला ……या साठीच अट्टाहास केला होता का कट्टर हिंदुत्वाचा’, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here