भावना गवळींना उद्धव गटाचा विरोध, विनायक राऊतांविरोधात पोलिसांत तक्रार

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी अकोल्यातून विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने निघत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार गवळी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना विरोध केला, त्यांना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी चिथावणीखोर केल्यामुळे आपल्याला विरोध केला असा आरोप करत भावना गवळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांत केली तक्रार

यासंबधी बोलताना खासदार भावना गवळी म्हणाल्या की, अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आपल्यावर अंगावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या कार्यकर्त्यांना आमदार नितीन देशमुख व विनायक राऊत यांनी चिथवले, हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. हे कृत्य त्यांच्या कुटुंबियांबाबत झाले असते तर चालले असते का? आपण याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी हे दोघेही मंगळवारी अकोल्याहून विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी राऊतांना निरोप देण्यासाठी आमदार नितीन देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते अकोला स्थानकावर आले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींना पाहताच त्यांच्यासमोर ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर खासदार भावना गवळी ट्रेनच्या डब्याबाहेर आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते. आमदार नितीन देशमुख यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी खासदार भावना गवळी यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचे चित्रफितीत दिसत आहे.

(हेही वाचा उद्धवा अजब तुझी सेना! आजोबांनी केला होता परप्रांतीयांना विरोध, नातवाचे मात्र लोटांगण)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here