ठाणे पोलिसांकडून ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी, पण ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

135

रोशनी शिंदे प्रकरणात पक्षपातीपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला असून याचा निषेध म्हणून ठाकरे गटाने शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय अशा मोर्चाचे आयोजन केले आहे. ठाणे पोलिसांनी या मोर्चाला अखेर परवानगी दिली आहे परंतु या मोर्चासाठी काही अटी आणि शर्थी घालून देण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : प्रवाशाने अडवला लोकल ट्रेनचा दरवाजा, संतप्त नागरिकांनी केली लाथाबुक्यांनी मारहाण! नेमके काय घडले, पहा व्हायरल व्हिडिओ)

ठाण्याला दुपारी ३ वाजता या मोर्चाला सुरूवात होणार आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

पोलिसांकडून अटी जारी

  • सदर कार्यक्रम दिलेल्या वेळी सुरू करून त्याच मुदतीत संपवण्यात यावा.
  • कार्यक्रम शांततेने, शिस्तीने व कोणताही गोंधळ न करता पूर्ण करावा.
  • कार्यक्रमाच्या दरम्यान आक्षेपार्ह फलक, चित्रे, चिन्हे व आकृत्या प्रदर्शित करू नयेत.
  • कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाषण, घोषणा, हालचाली करू नयेत तसेच प्रक्षोभक गाणी गाऊ किंवा वाजवू नयेत.
  • व्यक्ती, प्रेत किंवा आकृत्यांच्या प्रतीमांचे प्रदर्शन करणे किंवा जाळणे अशी कृत्य करू नये.
  • कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांततेस बाधा पोहचेल अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.