महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. खरी शिवसेना कोणाची? यावरून हा वाद सुरू झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव कोणत्या गटाला मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यासंदर्भातील कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. यानुसार शिवसेना ठाकरे गटाने ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर केला आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान! पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य?)
ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई काय म्हणाले?
२१ जूनपासून जो काही घटनाक्रम घडला, त्याबाबत सर्व माहिती आम्ही निवडणूक आयोगाला लेखी युक्तिवादात दिली आहे अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. शिंदे गटाने चिन्ह आणि पक्षाचे नाव यावर जो दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे दे सुद्धा आम्ही त्या युक्तिवादात सांगितले आहे असेही अनिल देसाई म्हणाले.
आमदार आणि खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही, पक्ष पूर्णपणे वेगळा असतो. पक्षाची विचारधारा, नेतृत्व या गोष्ट बघून मतदान केले जाते. त्यामुळे एखाद्या आमदार किंवा खासदाराने ही जनाताच माझी आहे असे म्हणणे हा दावाच मुळात चुकीचा आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून सर्व गोष्टी निवडणूक आयोगापुढे सादर केल्या असल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community