‘म्हाडा’ इमारतींच्या पुनर्विकास धोरणात बदल करा, या मागणीसाठी रहिवाशांनी सह्या केलेली १० हजार पोस्टकार्ड घेऊन उध्दव ठाकरे गटाने मंगळवारी (१७ ऑक्टोबर) मंत्रालयावर मोर्चा आणला. शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख यासह सर्व पदाधिकारी यात सहभागी झाले होते. मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातील टपालात ही पोस्टकार्ड जमा करण्यात येणार आहेत. (UBT)
(हेही वाचा – LinkedIn Job Cuts : लिंक्ड-इन कंपनीतून आणखी ७०० जणांची कर्मचारी कपात )
म्हाडा रहिवाशांचे हित जपावे – अजय चौधरी
शिवसेनेने राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेत मुंबईत म्हाडा इमारतींमध्ये राहणाऱ्या ३८ हजार कुटुंबांपैकी १० हजार कुटुंबीयांनी म्हाडा पुनर्विकास धोरणात बदल करण्यासाठी स्वाक्षरी केल्या आहेत. हा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात आणखी १० हजार असे टप्प्याटप्प्याने एकूण ३८ हजार कुटुंबीयांची स्वाक्षरी असलेली पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाणार आहेत. सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर मार्ग काढावा आणि म्हाडा रहिवाशांचे हित जपावे, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली आहे. (UBT)
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठपुराव्यामुळे म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी कमी ‘एफएसआय’मुळे पुनर्विकासासाठी विकासक पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज हा मोर्चा काढण्यात आला होता. घोषणा देत आणलेली पत्र मुख्यमंत्री महोदयांच्या टपालात जमा करण्यात आले. (UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community