Andheri East Bypoll Election Result: पतीचाही रेकॉर्ड मोडत ऋतुजा लटके विजयी, ‘नोटा’चा कोटाही वाढला

131

बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. यामध्ये अपेक्षेप्रमाणेच शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला आहे. लटके यांनी आपले दिवंगत पती रमेश लटके यांच्यापेक्षा देखील जास्त मते या निवडणुकीत मिळवली आहेत.

लटके यांचा विजय

भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय हा जवळपास निश्चित झाला होता. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ एक औपचारिकता राहिली होती. समोर कोणीही प्रभावी प्रतिस्पर्धी नसल्यामुळे ऋतुजा लटके यांनी जास्त मतांनी निवडून येणं हे अपेक्षितच होतं. त्यानुसार शेवटच्या फेरीत लटके यांना तब्बल 66 हजार 247 मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

(हेही वाचाः ‘मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका लागत नाहीत’,राणेंचा ठाकरेंवर घणाघात)

रमेश लटकेंचा रेकॉर्ड मोडला

शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत लटके यांना 52 हजार 817 मते मिळाली होती. तर 2019 मध्ये त्यांनी 62 हजार 773 मतांची कमाई केली होती. यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणा-या मुरजी पटेल यांनी 45 हजार 808 मते मिळवली होती, तर काँग्रेसच्या अमीन कुट्टी यांना 27 हजार 951 मतांवर समाधान मानावे लागले होते.

नोटाचा कोटा वाढला

रविवारी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागत असताना ऋतुजा लटके यांनी शेवटच्या फेरीत 66 हजार 247 मते मिळवली आहेत. तर त्यानंतर सर्वाधिक 12 हजार 776 मते नोटाला मिळाली आहेत. त्यापाठोपाठ अपक्ष आमदार राजेश त्रिपाठी यांना 1 हजार 569 मते मिळाली आहेत.

(हेही वाचाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या आमदारांसह गुवाहटीला जाणार! काय आहे कारण)

कोणाला किती मते?

  1.  ऋतुजा लटके- ६६ हजार २४७
  2. बाला नाडार – १ हजार ५०६
  3. मनोज नायक – ८८८
  4. नीना खेडेकर- १ हजार ५११
  5. फरहाना सय्यद- १ हजार ८७
  6. मिलिंद कांबळे- ६१४
  7. राजेश त्रिपाठी- १ हजार ५६९
  8. नोटा – १२ हजार ७७६

एकूण मते : ८६ हजार १९८

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.