शिवसेनेची स्थापनेच्या वेळी बाळासाहेबांच्या एका हाकेवर कट्टर शिवसैनिक जिथे निर्माण झाले त्या खांडके इमारतीची आठवण अखेर उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना झाली. दक्षिण मध्य मुंबईचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराची समारोप सभा दादर खांडके इमारतीखाली पार पडली. उद्धव ठाकरे यांनी प्रथमच निवडणुकीच्या निमित्ताने खांडके इमारतीबाहेर थांबले आणि दादरमध्ये कडवट शिवसैनिक असून बाळासाहेबांची सभाही याच इमारतीबाहेर झाल्याची आठवण करून खांडके बिल्डींगमध्येही माझा कडवट शिवसैनिक राहतो असेही सांगण्यास ते विसरले नाही. (Uddhav Thackeray)
दक्षिण मध्य मुंबईचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांची प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी वडाळा टाटा मिल कंपाऊंडपासून सुरु झालेली प्रचार फेरी वडाळा, धारावी, माहिम दादर विधानसभेतील खांडके इमारत क्रमांक ९ पर्यंत होती. या रॅलीमध्ये उबाठा शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. खांडके इमारतीच्या ठिकाणी या रॅलीचे सभेमध्ये रुपांतर झाल्यानंतर या सभेमध्ये उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संबोधित केले. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी खांडके इमारतीखालील काका कुलकर्णी यांच्या स्मृतीला पुप्पहार अर्पण केला. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – Vitthal-Rukmini Temple: भाविकांसाठी खुशखबर! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू)
शिवसेनेचा केंद्रबिंदू हा लालबाग परळ आहे, तसाच हा दादर आणि या दादरमधील खांडके इमारत आहे. खांडके इमारत क्रमांक ६ मधील घरांमध्ये एकेकाळी बाळासाहेब ठाकरे राहत होते आणि शिवसेनेचा कडवट शिवसैनिक याच खांडके इमारतीपासून, दादरपासून तयार झाला होता. (Uddhav Thackeray)
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्याला सुशिक्षित चारित्र्यवान उमेदवार संसदेत पाठवायचे असल्याचे सांगून दादर विभाग हा कट्टर शिवसैनकांचा विभाग म्हणून ओळखला जात असल्याचे सांगत त्यांनी खांडके इमारतीतील रहिवाशांचा आशिर्वाद हवा आहे म्हणून मी याठिकाणी आल्याचे सांगितले. खांडके इमारतीचे एक वजन असून तुम्ही कुणाला मत द्यायचे ते ठरवले आहे असल्याचे सांगत अनिल देसाई यांना मतदान करण्याचे आवाहन केले. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community