उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एक भीती बोलून दाखवली आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानेही आम्हाला चिन्ह किंवा पक्षाचे नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयावर आणतात की काय असा संशय आहे. अशी भीतीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलून दाखवली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका केली आहे.
निवडणूक आयोग त्यांचा नोकर आहे
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “पक्षांतर केल्यानंतरही अपात्रतेच्या केसचा निकाल लागला नाही. लवादाने दिलेला निर्णय चूक होता. निवडणूक आयोगाला निकाल देण्याचा अधिकार आहे का? कारण कोर्टाने म्हटलंय तुम्ही लोकप्रतिनिधीवरून पक्ष ठरवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला नकली सेना म्हणत आहेत. याचा अर्थ उघड आहे. निवडणूक आयोग त्यांचा नोकर आहे. लवादानेही ते म्हणतील तसं काम केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयावर आणतात की काय असा संशय आहे.” (Uddhav Thackeray)
काळे दिवस मात्र येऊ शकतात
“गेल्या 10 वर्षांत ज्यांनी नुसत्या थापा मारल्या, त्या थापाड्यांना तुम्ही डोक्यावर घेताय की फेकून देताय? या थापाडय़ांना पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा 10 वर्षे थापाच खाव्या लागतील आणि ऐकाव्या लागतील. पण आता जर का यांना फेकून दिलं तर देशात शांतता नांदेल. कायदा-सुव्यवस्था राहील. लोकशाही टिकेल. अन्यथा देशासमोर मला वाटतं की काळे दिवस आहेत. अच्छे दिन तर काही आले नाहीत, पण काळे दिवस मात्र येऊ शकतात.” (Uddhav Thackeray)
मला भारत सरकार पाहिजे
“मी मोदी सरकार असा उल्लेख करतोय. कारण मला मोदी सरकार नकोय. मला भारत सरकार पाहिजे. पण मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)
Join Our WhatsApp Community