उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, बंडखोर शिवसैनिकांना आवरा?

97

उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री असताना, राज्यावर कोरोनाचं प्रचंड मोठं संकट कोसळलेलं असताना जगातील एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून राज्य चालवत होते. पण आता त्यांची शिवसेना शिंदे हस्तगत करत आहेत, अशावेळी मात्र त्यांचे शिवसैनिक लाईव्ह पाहून निष्ठावान राहणार नाहीत अशी त्यांची खात्री झाली असावी म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

हा एक चमत्कारच…

हा महाराष्ट्र दौरा आणखी शिवसेना पदाधिकार्‍यांनी उठाव करु नये म्हणून केला जाणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र धोक्यात असताना आराम करावासा वाटत होता आणि आता त्यांचा पक्ष धोक्यात आल्याने त्यांना त्यांच्या आजारपणाचा विसर पडलेला आहे. अचानक ठाकरे हे ठणठणीत बरे झाल्यासारखे वाटत आहेत, आणि हा चमत्कार शिंदेंनी करुन दाखवलेला आहे.

पण एवढा आटापिटा करुन ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी होतील का? हा एक मोठा प्रश्न आहे. बाळासाहेबांनी माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा अशी आर्त हाक दिली होती. ज्या माणसाला स्वतःस हिटलर म्हणवून घेणं आवडत होतं, असा माणूस लोकांना विनंती करतो यामागची बाळासाहेबांची भावना लक्षात घेतली पाहिजे.

( हेही वाचा : दादरच्या पदपथांची तातडीने डागडुजी : जे पाच वर्षांत जमले नाही ते दहा दिवसात करून दाखवले)

बाळासाहेबांना माहिती होतं की आपल्यानंतर शिवसेना सांभाळण्यास आपले सुपुत्र आणि आपला नातू सक्षम नाही. त्यात त्यांनी ज्या लोकांना जवळ केलं आहे, ते स्वार्थी व निष्क्रिय आहेत, ते एक दिवस शिवसेना बुडवतील याची खात्री बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या मातब्बर नेत्याला माहिती असणे शक्य आहे.

आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करुन उरलेल्या शिवसैनिकांना निष्ठेचे महत्व सांगणार आहेत. परंतु त्यांनी स्वतः मात्र हिंदुत्वाची कास केव्हाच सोडलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक उद्धव ठाकरेंची साथ देणार नाहीत. संजय राऊतांना मानणारे मात्र ठाकरेंशी निष्ठा बाळगतील. आता जे होत आहे, याची जाणीव बाळासाहेब ठाकरेंना आधीच झालेली होती. बाळासाहेब एक द्रष्टे नेते होते. आता शिवसैनिकांना उठाव करण्यापासून अडवता येणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.