आता मी युतीच्या विषयावर काही भाष्य करत नाही युतीचा विचार करून पक्ष बांधण्याचा विचार करून पुढे गेले तर पक्ष बांधला जाणार नाही जर तरच विषय आहे. २०१४, २०१७ मध्ये मी टाळी देण्याचा प्रयत्न केला, हा माणूस बोलतो एक आणि करतो एक तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. अख्या महाराष्ट्राला माहित आहे त्याही पेक्षा अधिक प्रमाणात मला तो अधिक माहित आहे.
उद्धव ठाकरे ढोंगी
छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला, तो पेशव्यांनी पुढे नेला आणि मराठीचा झेंडा अटकेपार पोहचवला. विचार कोण पुढे नेतो हे महत्वाचे असते. शिवरायांचा विचार पेशव्यांनी पुढे नेला. बाळासाहेबांचा विचार शरद पवारांमुळे शिवसेनेने मोडीत काढला. बॅनरवर बाळासाहेबांच्या नावासमोर जनाब लावले. सत्तेसाठी सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायच्या आणि सगळे हातातून निघून गेल्यावर पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने जप करायचा, हे सगळे ढोंगी आहेत. मग परिस्थती आल्यावर बारीक चेहरा करून पुढे यायचे. इतके दिवस आजारी होतात म्हणून बाहेर फिरत नव्हतात, मंत्रालयात जात नव्हता, आता रोज शिवसेना भवनात का जातात, टाटा सगळे आजार बरे झाले का, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला केला.
(हेही वाचा शरद पवारांकडून पुन्हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका)
हात स्वच्छ असेल तर ईडीला सामोरे जा
ईडीच्या माध्यमातून भाजपा संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप होता आहे. असे कुणी कुणाला संपवत नाही, तसे असेल जा ना ईडीला सामोरे. हात स्वच्छ असेल तर जा पुढे. मलाही बोलावले होते. आणीबाणीच्या वेळी सगळ्यांना आत टाकले होतेच, शेवटी फासे पालटत असतात. आधी काँग्रेस करत होती, आता भाजप करत आहे, उद्या भाजपच्या विरोधात कुणी करेल. म्हणून आपण जे करतो त्याचे पायंडे पडत असतात, हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेत संपत्ती आणि सिम्पत्ती
बाळासाहेब आणि माझ्या वडिलांनी मार्मिक सुरु केला, तेव्हा मार्मिकचा खप १ लाख होता. १९६० साली ही स्थिती होती. तो मार्मिक आज वाचला जात नाही. मार्मिक येतो हेच लोकांना माहित नाही. कारण त्यात बाळासाहेब नाहीत. बाळासाहेब होते तेव्हा सामनाचा ३-४ लाख खप होता. आज तितका खप का नाही, कारण आज त्यात बाळासाहेब नाहीत. मग सहानुभूतीसाठी हे का सुरु ठेवायचे. जर वारसा जपणारी माणसे असतील तर ठीक आहे. इथे फक्त संपत्ती आणि सिम्पत्ती सुरु आहे. शिवसेनेला बाळासाहेबांनंतर निवडणुकीत सहानुभूती मिळली, नंतर मोदींच्या नावावर मते मिळाली, आता काय करणार?, असेही राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा शिवसेना-राष्ट्रवादीचे निकालाआधीच ठरले होते…; देवेंद्र फडणवीस यांची टीका)
युतीचा फॉर्म्युला सोयीने का बदलला?
शिवसेना वारंवार बंद खोलीतील दाराआड चर्चेचा विषय पुढे आणते. मग प्रचारसभेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा जाहीरपणे मुख्यमंत्री भाजपचा होईल, असे म्हणाले होते. तेव्हाचा का बोलला नाहीत. जसे निकाल लागले तसे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा विषय आणला. जेव्हा पहिल्यांदा युती झाली, तेव्हा ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे ठरेल होते. त्यानुसार दोन वेळा शिवसेनेचे जास्त आमदार आले आणि त्यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला होता, त्यावेळी भाजपने कधी अडीच वर्षांचा मुद्दा मांडला नव्हता, मग आताच का अडीच वर्षांचा मुद्दा मांडता?, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community