Marathwada Water Grid Project : उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली; देवेंद्र फडणवीस

141
Marathwada Water Grid Project : उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली; देवेंद्र फडणवीस
Marathwada Water Grid Project : उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली; देवेंद्र फडणवीस

बऱ्याच वर्षांनी मंत्रीमंडळ बैठक मराठवाड्यात होत आहे. (Marathwada Water Grid Project) ही बैठक होत असताना विरोधी पक्षांनी ही बैठक होऊ नये यासाठी प्रयत्न केला. 2016 मध्ये 31 विषय होते आणि 2017 मध्ये 10 विषय पूर्ण झाले होते. आता आढावा घेतल्यानंतर 23 विषय पूर्ण झाले आहेत. वॉटर ग्रीडसंदर्भात टेंडर काढले होते. जे प्रश्न विचारत आहेत, त्या उद्धव ठाकरेंनी या योजनेची हत्या केली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तब्बल ७ वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी ही टीका केली.

(हेही वाचा – Trade Deficit Widens : भारतीय व्यापारी तूट १० महिन्यांच्या उच्चांकावर)

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ”जे लोक मागच्या बैठकीसंदर्भात विचारत होते, त्याचे मी विश्लेषण दिलेले आहे. मराठवाड्याला प्राधान्य दिले आहे. मंत्रिमंडळाची याआधीची जी बैठक आम्ही संभाजी नगरमध्ये घेतली होती, त्यातले जवळपास सगळ्या निर्णयांची अमलबजावणी झालेली आहे. त्याची माहितीही आम्ही पत्रकारांना देणार आहोत. दुसरं जे लोक आज हे म्हणत आहेत की मागच्या बैठकीत काय झाले ? त्यांना माझा सवाल आहे, अडीच वर्षात तु्म्ही मराठवाड्यासाठी काय केले ? तुम्ही सरकारमधे होतात. एखादा निर्णय मागे राहिला असेल, तर पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्षे माशा मारत होतात का ? मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचे काम ज्या सरकारने केले, आता तेच लोक आम्हाला विचारत आहेत. जे दिले होते, त्याचाही मुडदा पाडला. यांना मराठवाड्याशी घेणे-देणे नाही. जर मराठवाड्याच्या हितासाठी बैठक होत असेल, तर ती हाणून कशी पाडायची हा यांचा कावा आहे, हे कावेबाज लोक आहेत.” (Marathwada Water Grid Project)

काय आहे वॉटर ग्रीड प्रकल्प ?

मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन 2016 साली तत्कालीन राज्य सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड योजनेची घोषणा केली. दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा उद्देश यामागे होता. ही योजना मराठवाड्यातील एकूण 64 हजार 590 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी होती. 79 शहर, 76 तालुके आणि 12 हजार 978 गावांचा या योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असेल. 2011च्या लोकसंख्येची आकडेवारी गृहित धरल्यास 53.96 लाख शहरी आणि 133.36 लाख ग्रामीण म्हणजेच 187.32 लाख लोकसंख्या या लाभक्षेत्रात होती. राठावाडा वॉटर ग्रिड योजनेअंतर्गत मराठवाड्यातील 11 धरणे एकमेकांशी लूप पद्धतीने जोडण्याची योजना होती. 2020 मध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाला महाविकास आघाडीने ब्रेक दिला. (Marathwada Water Grid Project)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.