राज्यातील कोरोनाचे संकट हाताबाहेर गेले आहे, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात यावा, असे मत सर्व स्तरातून व्यक्त होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील आठवडाभरापासून समाजातील सर्व घटकांशी चर्चा करत होते, त्यांची लॉकडाऊनबाबत मानसिकता तयार करत होते, परंतु प्रत्यक्षात जेव्हा मंगळवारी, १३ एप्रिल रोजी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला, तेव्हा लॉकडाऊनची घोषणा न करता मागील आठवड्यात जे कडक निर्बंध लावले होते, तेच पुन्हा पुढे सुरु ठेवले आहेत.
कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात बुधवार, १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते? pic.twitter.com/l7FXSaeI8f
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 13, 2021
सर्व दुर्बल घटकांना दिलासा
आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.
एक महिना मोफत अन्नधान्य
अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.
शिवभोजन थाळी मोफत
राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.
निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य
या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल. .
बांधकाम कामगारांना अनुदान
नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य
राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.
आदिवासी कुटुंबांना सहाय्य
आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.
कोविडवरील सुविधा उभारणी
याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५४०० कोटीचे पॅकेज
- राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार.
- पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी.
- 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार.
- राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. 12 लाख कामगारांना उपयोग होणार.
- घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत करणा.
- अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार.
- परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये – १२ लाख लाभार्थी आहेत.
- खावटी योजनेच्या आदिवासी कुटुंबांना – २ हजार रुपये – १२ लाख लाभार्थी
काय बंद, काय सुरु?
अत्यावश्यक सेवांमध्ये यांचा समावेश!
- रुग्णालय, तपासणी केंद्रे (डायग्नोस्टिक सेंटर), दवाखाने, वैद्यकीय विमा कंपनी, मेडिकल, औषध निर्मित कंपन्या आणि अन्य आरोग्य सेवा
- किराणा, भाजी, डेअरी, बेकरी, खाद्यपदार्थ दुकाने
- सार्वजनिक वाहतूक – ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या
- अन्य देशांशी संबंधित कार्यालये
- स्थानिक स्वराज्य संस्थांची पावसाळ्यापूर्वी कामे
- स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व कामे
- माल वाहतूक, कृषी संबंधी सर्व सेवा, ई – कॉमर्स, अधिस्विकृत पत्रकार
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपत्कालीन प्राधिकरणाच्या सेवा
आऊट डोर सेवा
- सर्व समुद्र किनारे, उद्याने, मैदाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ आणि शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत बंद
- स्थानिक स्वराज्य संस्थांनी या नियमांचे पालन होते का हे पहाणे
दुकाने, मॉल आणि बाजार
- अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त सर्व दुकाने, बाजार आणि मॉल बंद
- अत्यावश्यक सेवांची दुकाने सोशल डिस्टन्स ठेवून सुरु ठेवणे
- दुकानात काम करणाऱ्यांचे लसीकरण अनिवार्य
सार्वजनिक वाहतूक
- रिक्षा – चालक+२ प्रवासी
- टॅक्सी – चालक + २ प्रवासी
- बस – केवळ आसने, उभ्या प्रवाशांना परवानगी नाही
- सर्व सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांनी मास्क घालणे अनिवार्य अन्यथा ५०० रु. दंड
- चारचाकी टॅक्सी – जर प्रवाशांनी मास्क घातला नाही तर चालकाला ५०० रुपये दंड
- सर्व वाहने निर्जंतुक (सॅनिटाईज) करणे
- सावर्जनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्वांचे लसीकरण करावे
- यातील कुणीतरी RT-PCR चाचणी निगेटिव्ह नसेल आणि लस घेतलेली नसेल तर १ हजार रुपये दंड
- बाहेर गावी जाणाऱ्या वाहनांमध्येही उभ्या प्रवाशांना परवानगी नाही
- बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेनमध्ये मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपये दंड
कार्यालये
- खालील कार्यालये वगळता सर्व खासगी कार्यालये बंद
- सहकारी, सार्वजनिक आणि खासगी बँक
- बीएसई/एनएसई, इलेक्ट्रिक सप्लायसंबंधी कंपन्या
- दूरसंचार कंपन्या विमा/वैद्यकीय विमा कंपन्या
- औषधनिर्मिती कंपन्यांची अशी कार्यालये जी उत्पादनाशी संबंधित आहेत
- स्थानिक स्वराज्य संस्थांची आपत्कालीन व्यवस्था संभाळणारी कार्यालये
- सरकारी कार्यालये – ५० टक्के उपस्थिती
- वीज, पाणी, बँक आणि अन्य अर्थक्षेत्राशी संबंधित कार्यालये
- सरकारी कार्यालये, तसेच सरकारी कंपन्या यांच्या बैठका ऑनलाईन कराव्यात
- सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यंगतांना प्रवेश निषिद्ध
खासगी वाहतूक
- सर्व खासगी वाहने, खासगी बसगाड्या सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहावीत
- शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने
चित्रपटगृह आणि मनोरंजन क्षेत्र
- चित्रपगृहे, नाट्यगृहे, सभागृहे आणि पार्क बंद
- व्हिडिओ गेम पार्लर बंद, वॉटर पार्क बंद
- जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडा संकुल बंद
रेस्टारंट, बार, हॉटेल
- सर्व रेस्टॉरंट, बार बंद
- सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ पार्सल व्यवस्था सुरु
- घरपोच पार्सल व्यवस्था सुरु
- घरपोच पोहचवणाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे
- जर लसीकरण केले नसेल तर RT-PCR चाचणी करावी याचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपये दंड
प्रार्थनास्थळे
- सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद
- प्रार्थनास्थळांची देखभाल करणाऱ्यांनी लस घेणे अनिवार्य
केशकर्तनालय/स्पा सेंटर/ब्युटी पार्लर
केशकर्तनालय, स्पा सेंटर, ब्युटी पार्लर बंद
वृत्तपत्रे
- वृत्तपत्रे छपाई होऊ शकते
- सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपोच केले जातील
- यासंबंधी सर्व घटकांनी RT-PCR चाचणी करावी
शाळा आणि महाविद्यालय
- शाळा, महाविद्यालये बंद
- इयत्ता १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात येतील सर्व खाजगी शिकवण्या बंद
धार्मिक/सामाजिक/ राजकीय कार्यक्रम
धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी
काय म्हणाले मुख्यमंत्री?
- आजपासून आपले नवीन वर्ष सुरू होत आहे
- गेल्यावर्षी देखील आपण शुभेच्छा देत प्रार्थना केली होती कोविड मुक्त गुढीपाडवा होऊ दे
- मधल्या काळात आपण कोविडवर मात केली
- मधल्या काळात आपल्याला वाटत होते की हे युद्ध आपण जिंकत होतो त्या युद्धाला आता सुरुवात झाली आहे
- आजचा आकडा हा 60 हजार 212 इतका आहे,
- आज 523 चाचणी केंद्रे आपल्या राज्यात आहेत
- चाचणीसाठी आणि चाचणीचे रिपोर्ट यायला वेळ लागत आहे
- त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे यंत्रणा कमी पडत आहे
- चाचणी केंद्रावर बोजा आलेला आहे.
- मुंबईतमध्ये देखील आपण खूप वाढ केली आहे
- बेडची संख्या वाढवलेली आहे
- आज साडे तीन लाखाच्या वर बेड वाढवले आहेत
- पण आज सुविधांवर भार आलेला आहे
- हा भयानक आकडा आहे
- कोविडची लाट कमी झाल्यावर आपण दहावी-बारावी परीक्षा घेऊ शकतो
- पण आता जी आपली परीक्षा सुरू आहे त्यावर मात करायला हवी
- आज सर्व घटकांशी मी चर्चा करत आहे
- किती काळ आता चर्चा करत बसायची
- आता ही वेळ नाही
- आज आपल्या राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन दर दिवशी होतो
- आज साडे नऊसे मॅट्रिक टन ऑक्सिजन रुग्णाला वापरत आहोत. म्हणजे आपण काटोकाट चालत आहोत
- आपण औषध कमी पडू देणार नाही
- आपन केंद्राकडे विनंती केली आणि ही परिस्थिती सांगितली आहे
- एकही रुग्ण किंवा मृत्यू आपन लपवत नाही
- म्हणून मी पंतप्रधान यांना विनंती केली की येत्या काळात आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे असे सांगितले आहे
- आपल्याला सुरळीत पुरवठा हवा म्हणून आपण पंतप्रधानांना विनंती करत आहे
- आपल्याला लष्करी तज्ज्ञाची मदत घेऊन हवाई मार्गाने ऑक्सिजन आणू शकतो का हे बघून त्याची परवानगी द्या
- आज आपल्याला रोज ऑक्सिजनचा पुरवठा लागणार आहे
- पंतप्रधानानी तशी मदत करावी मी त्यांना फोनही करेन आणि पत्रही मिळेल
- लघु आणि मध्यम वर्गासाठी जीएसटीचा परतवा पुढील तीन महिन्यांसाठी मुदत वाढ द्यावी अशी मी पंतप्रधान यांना विनंती करत आहे
- ज्यांची रोजी रोटी यामध्ये हललेली आहे. अशा लोकांना आपण व्यक्तीगत मदत काय करावी आणि यासाठी पंतप्रधान यांनी मदत करावी
- लसीकरण हे वाढवावे लागेल
- लस दिल्यानंतर प्रतिकार शक्ती वाढायला वेळ लागत आहे
- येत्या काही काळात आपल्याला लसीकरणं वाढवावे लागेल
- या लाटेच्या तुलनेत ही लाट खूप मोठी आहे
- गेल्यावर्षी आपल्या जिद्दीमुळे आपण मोठी लाट येऊ दिली नाही
- गेल्यावेळी आपण ते करून दाखवले आहे
- गेल्यावेळेला आपण जेवढी आरोग्य सुविधा वाढवली आहे ती तोकडी पडताना दिसत आहे
- ही रुग्ण वाढ भयावह आहे.
- आपण येत्या काळात आरोग्य सुविधा आणखी वाढवत आहोत
- उपचार करण्यासाठी आपल्याला डॉक्टर लागणार त्यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत
- निवृत्त झालेल्या परिचारिका आणि आरोग्य सेविकांना मी आवाहन करत आहे की त्यांनी देखील आता लढण्यासाठी पुढे या
- हे युद्ध जिकण्यासाठी सर्वांनी पुढे या
- उणीधुनी काढत बसू नका नाहीतर आपल्याला जनता माफ करणार नाही
- आता राजकारण बाजूला ठेवा असे पंतप्रधान यांनी लाईव्ह येऊन सांगायला हवे
- आपण निर्बंध आपल्यासाठी लावत आहे
- आपण बराच वेळ चर्चेत घालवला आहे
- पण आता ती वेळ आली आहे
- * सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाण बंद राहतील*
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही
- त्या फक्त अतिआवश्यक कारणासाठी सुरू राहतील
- रुग्णालय, दवाखाने, वैद्यकीय सेवा देणारे, लस उत्पादक, मास्क जंतू नाशक उत्पादक, शीतगृह, हवाई वाहतूक उघडे राहितील
- आपल्याला रोजीरोटी महत्वाची आहे पण आधी जीव वाचला पाहिजे
- आता निर्बंधात वाढ करत आहोत
- हे निर्बंध उद्या आठ वाजल्यापासून लागू होतील
- पंढरपूर मध्ये मतदान झाल्यानंतर निर्बंध लागतील
- उद्या संध्याकाळ पासून आपण 144 कलम लागू करत आहोत
- पुढचे 15 दिवस असणार
- कोणत्याही व्यक्तीला योग्य कारण नसेल तर घराबाहेर पडता येणार नाही
- बँक, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, अधिस्वीकृती धारक पत्रकारांना फक्त मुभा
- आपल्याला सर्व ये-जा थाबवायची आहेत
- रस्त्यावरच्या खाद्य पदार्थाना परवानगी देत आहोत
- सकाळी सात ते आठच्या वेळेत पॅक करून आपण खाणे दिले जावे
- हॉटेल्स-रेंस्टोरंट बंद राहणार
- रोजी थोडीशी मंदावणार आहे फक्त रोटी थांबणार नाही
- 5400 कोटींचे मदत पॅकेज…
- फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये देणार
- नोंदणीकृत घरगुती काम करणाऱ्यांना निधी देणार
- परवानाधारक रिक्षा चालकांदेखील 1500 रुपये देणार
- बांधकाम कामगार 1500 रु मदत
- अधिकृत फेरीवालयांनाही 1500 रु
- आपल्याशी जी माझी बांधिलकी आहे त्यासाठी मी निर्बध लादत आहे
- न चिडता ती स्वीकार
- कोविड भगाव या पद्धतीने आपल्याला काम करावे लागेलकोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना
- अतिरिक्त निधी ३३०० कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत.
- हे सगळ करण्यासाठी पाच हजार चारशे कोटी रुपये निधी बाजुला काढून ठेवत आहे.
- राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार.
- पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी.
- 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार.
- राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. 12 लाख कामगारांना उपयोग होणार.
- घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत करणा.
- अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार.
- परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये – १२ लाख लाभार्थी आहेत.
- खावटी योजनेच्या आदिवासी कुटुंबांना – २ हजार रुपये – १२ लाख लाभार्थी