Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख शिंदे गटात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी नेते विजय शिवतारे हे सुद्धा उपस्थित होते.

222
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख शिंदे गटात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यानंतर आता राज्यातील राजकारणामध्ये वेगाने गोष्टी घडत आहेत. नुकताच महाविकास आघाडी पक्षाची बैठक झाली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवार १७ मे रोजी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. मात्र अशातच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

(हेही वाचा – Fraud : मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच पुणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

हेही पहा – 

ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी नेते विजय शिवतारे हे सुद्धा उपस्थित होते.

महेश पासलकर हे ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) पुणे जिल्हा प्रमुख आहेत. तसेच वीर बाजी पासलकर ग्रामीण विकास केंद्राचे ते अध्यक्षही आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.