उद्धव ठाकरेंचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या आहेत. खेडनंतर आता उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा होणार असून यासाठी लागलेल्या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
( हेही वाचा : धावत्या लोकलमधील थरारक घटना; दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न)
खेडच्या सभेनंतर मालेगावमध्ये त्यांची सभा होणार असून त्यासाठी उर्दू भाषेत पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आहेत.
उर्दू भाषेतील पोस्टरवरून टीकास्त्र
या उर्दू भाषेतील पोस्टरवरून शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब असते तर असे पोस्टर लागलेच नसते त्यांना हे सहन झालं नसतं, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याने त्यांना हे सगळं सहन करावे लागत आहे अशी टीका मंत्री शंभुराज देसाईंनी केली आहे.
तसेच शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी सुद्धा यासंदर्भात ट्वीट केले आहे, “ह्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं.. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा??” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/sheetalmhatre1/status/1639579304605683712
Join Our WhatsApp Community