दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता, या गुप्ताची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. या गंभीर आरोपाने खळबळ उडाली असून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही म्हस्के यांनी शनिवारी (१० ऑगस्ट) केली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
दक्षिण आफ्रिकेत गुप्ता बंधू यांनी अब्जावधी रुपयांचा रॅण्ड घोटाळा केला आहे. याप्रकरणातील एक आरोपी गुप्ता दिल्लीत आला होता, त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्याची अर्धा तास भेट घेतली असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. गुप्ता आणि उद्धव ठाकरे यांची भेट उघड होऊ नये यासाठी दिल्लीतील संजय राऊत यांच्या घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण, या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत यात हा प्रकार उघड होईलच याची तपास यंत्रणांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.
(हेही वाचा – Raj Thackeray: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी पवार आणि ठाकरेंना घेरलं)
उद्धव ठाकरे नक्की कशासाठी भेटले याचा उलगडा झाला पाहिजे – म्हस्के
सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे कट आणि कमिशनचे कंटेनर येणं बंद झालं आहे. आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना? असा संशय ही त्यांनी व्यक्त केला. म्हस्के पुढे म्हणाले की, राऊतांच्या बंगल्यात ७ तारखेला संध्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आलं होतं? वादग्रस्त गुप्ता बंधूंना उद्धव ठाकरे नक्की कशासाठी भेटले याचा उलगडा जनतेसमोर झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मला मुख्यमंत्री पद द्या अशी भीक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस हायकामांडकडे मागितली, यासाठीच त्यांचा तीन दिवसीय लोटांगण दिल्ली दौरापार पडला. पण काँग्रेसने त्यांना हुसकावून लावले आहे. दिल्लीत त्यांना कुणी भाव दिला नाही, अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली. राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यात उद्धव ठाकरे यांचा अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ता बंधूंची भेट घडवून आणलेली नाही ना? असा सवाल उपस्थित करून म्हस्के यांनी आघाडीतील बिघाडी दाखवून दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community