Uddhav Thackeray : आमदारांनी पूर्ण काळ अधिवेशनास उपस्थित राहावे; स्वतः मात्र दोनच दिवस उपस्थित राहणार

उद्धव ठाकरे मात्र अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात अनुपस्थित राहणार असून ते ११ व १२ डिसेंबर रोजी अधिवेशनाला हजर राहणार आहेत.

152
Uddhav Thackeray : आमदारांनी पूर्ण काळ अधिवेशनास उपस्थित राहावे; स्वतः मात्र दोनच दिवस उपस्थित राहणार
Uddhav Thackeray : आमदारांनी पूर्ण काळ अधिवेशनास उपस्थित राहावे; स्वतः मात्र दोनच दिवस उपस्थित राहणार

शिवसेना (उबाठा) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आमदारांची बैठक मातोश्रीवर घेतली. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. अधिवेशनाच्या दृष्टीने आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यात सर्व आमदारांच्या उपस्थितीवर भर देण्यात आला. मात्र माहितीनुसार उद्धव ठाकरे मात्र अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात अनुपस्थित राहणार असून ते ११ व १२ डिसेंबर रोजी अधिवेशनाला हजर राहणार आहेत. असे जर असेल तर इतरांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असंच म्हणावं लागेल. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Shubman Gill New GT Captain : गुजरात टायटन्सचा नवीन कर्णधार शुभमन गिलचा संघाला निष्ठा आणि जबाबदारीचा मंत्र)

उबाठा गटाच्या आमदारांना उद्धव ठाकरेंच्या सूचना

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आपली भूमिका ठामपणे मांडा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या आहेत. मुंबईतील आमदारांनी सामान्य नागरिकांच्या समस्यावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करा तसेच बाहेरील आमदारांनी शेतकरी नुकसान आणि विम्या संदर्भात सरकारला प्रश्न उपस्थित करा. आता अधिवेशनाच्या अगोदरच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर द्या, उद्धव ठाकरे यांचे आमदारांना आदेश. तसेच शेतकऱ्यांच झालेलं नुकसान जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहा. (Uddhav Thackeray)

हिवाळी अधिवेशनाचा एकूण कार्यकाल पाहिला तर कामकाजाचे फक्त दहा दिवसच दिसून येतात. त्यातही गोंधळात सर्वसामान्यांचे किती प्रश्न मार्गी लागतात हा देखील प्रश्नच आहे. अवकाळी मुळे शेतकरी या अधिवेशनाकडे फार अपेक्षेने पहात असताना अधिवेशनाचा दहा दिवसांचा कार्यकाळ फारच कमी दिसून येतो. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.