मुंब्र्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येणार आहेत, त्याआधीच त्यांचा हा दौरा वादात सापडला आहे. ठाकरे आणि शिंदे गटात यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्सही फाडण्यात आले. हे बॅनर्स मुंब्रा आणि मुलुंड टोलनाक्याजवळ लावण्यात आले होते. यामुळे आता मुंब्र्यात तणाव वाढला आहे. उद्धव ठाकरे यांनी या शाखेकडे येण्यावर शिंदे गटाने विरोध केला आहे, पोलिसांनी जमाव बंदीचा आदेश दिला आहे.
जमाव बंदीचा आदेश
सध्या मुंब्य्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या भागात जमाव बंदीचा आदेश दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीस बजावल्या आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुलुंड चेक नाक्याजवळ येतील तेव्हा त्यांना त्यांचा दौरा रद्द करावा, अशी विनंती पोलीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना करणार आहेत. तरीही उद्धव ठाकरे मुंब्र्यात आले, तर पोलीस त्यावर कारवाई करतील, अशी शक्यता आहे.
दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मुंब्रा येथील शाखा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे यावर उबाठा दावा करू शकत नाही. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या ठिकाणी येण्यास विरोध करणार आहे. तर उबाठा गटाने आम्ही हा दौरा करणारच, हिंमत असेल तर रोखून दाखवाच, असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community