Uddhav Thackeray यांचा गुरुदास कामत होणार?

208
Uddhav Thackeray यांचा गुरुदास कामत होणार?
Uddhav Thackeray यांचा गुरुदास कामत होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात उबाठा गट आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. जरी काँग्रेसकडून पटोलेंबाबतच्या उबाठा गटाच्या भूमिकेवर सारवासारव होत असली तरी परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस मोठा भाऊ असल्याने उबाठा गटावर दबाव निर्माण करायचा आहे. ज्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटेनासा झाला आहे, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा : ठाकरे घराण्यातील दूसरा युवराज निवडणुकीच्या रिंगणात; Amit Thackeray कुठून लढणार?

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काँग्रेस आणि उबाठा गटात विदर्भातील काही जागांवरून वाद असल्याचे बोलले जात होते. मात्र आता हा वाद इतका विकोपाला जात आहे की, यातून उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली आहे. कारण एकीकडे महायुतीतील मोठा पक्ष असणाऱ्या भाजपाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. परंतु बंडानंतर आधीच अस्वस्थ असणाऱ्या ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यात राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठांकडून उबाठाला साईडलाईन करण्यासाठी ही व्युहरचना आखल्याचे बोलले जात आहे. (Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरेंचा गुरुदास कामत का?

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि गांधी परिवाराशी अत्यंत जवळीक असलेले गुरुदास कामत यांना २०११ नंतर पक्षातच ‘कॉर्नर’ करण्यात आले. आधी त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले नंतर त्यांना मंत्रीपदी बढती दिली मात्र खाते अत्यंत किरकोळ समजले जाणारे दिले गेले. तसेच पक्षातही त्यांचे वजन कमी करण्यात आले. अखेर ते नाराज होऊन स्वतः बाजुला झाले. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे यांना आता मविआमध्ये ‘कॉर्नर’ करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत, अशी चर्चा आहे. हळूहळू ठाकरे कंटाळून बाजुला जातील अशी काहीशी रणनीती आखण्यात आल्याचे दिसून येत आहे. (Uddhav Thackeray)

त्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस अशाच प्रकारे उद्धव ठाकरेंना एकटे पाडून आघाडीतून बाहेर पडण्याची परिस्थिती निर्माण करत असल्याचे दिसत आहे. एकाबाजूला जागावाटपाच्या चर्चेत उबाठाला अडकवून ठेवायचे आणि दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी उबाठा गटाला मविआतून बाहेर पडण्यास भाग पाडायचे. अशीच काँग्रेसची रणनिती असल्याचे सूत्रांकडून समजते. ज्यापद्धतीने गुरुदास कामत यांना काँग्रेसने पक्षातूनच नव्हे तर राजकारणातून बाहेर पडण्याची परिस्थिती निर्माण केली. तसाच फॉर्म्यूला उद्धव ठाकरेंच्या बाबतीत राबवून मविआतून उबाठाला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा डाव काँग्रेसकडून आखला जात आहे. (Uddhav Thackeray)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.