राजस्थानमधील जगप्रसिद्ध अजमेर दर्गा शरीफ (Ajmer Dargah) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा काही संघटनांकडून केला जातोय. या दर्ग्यात ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरुस लवकरच सुरु होणार आहे. तत्पूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दि. २४ डिसेंबर रोजी दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवली आहे. ही चादर खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
( हेही वाचा : समुद्र किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचा बंदोबस्त करणार; पदभार स्विकारताच Nitesh Rane यांचा इशारा)
मातोश्री या निवस्थानी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही चादर सुपूर्द केली. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत(Vinayak Raut ) , शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar), मुझफ्फर पावसकर (Muzaffar Pawaskar), कमलेश नवले, नौमन पावसकर, उपशाखाप्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते. त्यामुळे अजमेर दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याच्या दाव्याबाबत न्यायालयात खटला सुरु असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही चादर पाठवली आहे. त्यामुळे विरोधकांकडून हा मुद्दा चर्चिला जाऊ शकतो.
पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार
राजस्थानच्या अजमेर दर्ग्यामध्ये (Ajmer Dargah) मंदिर असल्याच्या दाव्यावर दि. २० डिसेंबर दिवाणी न्यायालयात दुसऱ्यांदा सुनावणी झाली. याचिकाकर्ते आणि इतर पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील निर्णयाची तारीख २४ जानेवारी आहे. (Uddhav Thackeray)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community