Balasaheb Thackeray यांच्या स्मारकाचे श्रेय कुणाचे? उद्धव ठाकरे म्हणाले, उद्घाटन करेल त्या…

70
Balasaheb Thackeray यांच्या स्मारकाचे श्रेय कुणाचे? उद्धव ठाकरे म्हणाले, उद्घाटन करेल त्या...
Balasaheb Thackeray यांच्या स्मारकाचे श्रेय कुणाचे? उद्धव ठाकरे म्हणाले, उद्घाटन करेल त्या...

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दि. १० जानेवारी रोजी महापौर बंगला या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरु झाले आहे. या कामासाठी आर्टिटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांचे धन्यवाद मानतो. कारण त्यांनी फार जिकरीचे काम या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण करून केले आहे. तसेच एक योगायोग म्हणजे या स्मारकाच्या शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांचंही स्मारक आहे. त्यामुळे महापौर बंगला या वास्तुशी आम्ही भावनिकरित्या जोडले गेलो आहोत, असे ठाकरे म्हणाले.

( हेही वाचा : भारत Renewable Energy क्षेत्रात जगामध्ये आघाडीवर; केंद्रिय नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे, त्यामुळे या वास्तुच्या पावित्र्याला धक्का न देता काम करणे कठीण होते. सीआरझेडचा कायदाही होता. आभा लांबा यांनी भूमिगत स्मारक करुया ही कल्पना मांडली. समुद्राचा रेटा जमिनीच्या खालूनही मोठा असतो. ते आव्हान स्वीकारुन हे काम पूर्ण करण्यात आले. खबरदारी घेऊन वास्तू उभी करणं महत्त्वाचं काम होतं त्यामुळे आभा लांबा यांचे मी आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. चार भिंती आणि नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा दोन आता सुरु होईल. शिवसेनाप्रमुख यांचा जीवनपट स्मारकात आहे. २३ जानेवारी २०२६ पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतं आहे. त्याच्या आत आम्ही हे स्मारक त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी ठेवू, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Balasaheb Thackeray)

तसेच या स्मारकाचं श्रेय कुणाला जाणार? असे विचारले असता. स्मारकाचं उद्घाटन करताना जे सरकार असेल त्यांना श्रेय जाईल. श्रेयवादाची लढाई व्हायलाच नको. यात काय श्रेयाची लढाई लढायची? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आहेत असे कुणीही या स्मारकाचं श्रेय घेऊ शकत नाहीत. श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, असे ही ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. (Balasaheb Thackeray)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.