शरद पवारांचा ‘हा’ गुण त्यांचे शिष्य उद्धव ठाकरे का घेत नाहीत?

132

सध्या राजकारण हे एका वेगळ्याच वळणावर चाललंय. द्वेष, मत्सर हा राजकारणाला लागलेला शाप आहे. पूर्वी राजकारणात खेळीमेळीचं वातावरण असायचं. पण सध्या मात्र द्वेषांचं वातावरण सुरु झालं आहे. महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होता. भाजपला सत्तेबाहेर ठेवणे. या एका कारणासाठी विचार जुळत नसलेले पक्ष एकत्र आले आणि त्यानंतर जो सावळा गोंधळ माजला यास महाराष्ट्र साक्षीदार आहे.

द्वेषाच्या राजकारणाचं प्रतीक

मुख्यमंत्री कसा नसावा हा आदर्श उद्धव ठाकरे यांनी घालून दिला. या कार्यकाळात अशी अनेक कामे झाली, जी महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी घातक होती. दिशा आणि सुशांतच्या संशयास्पद मृत्यूमुळे उद्भवलेलं नकारात्मक वातावरण. सरकारने ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळलं ते खेदजनक आहे. पालघर साधू हत्याकांड, सर्वसामन्य जनतेला सत्ताधार्‍यांच्या लोकांकडून झालेली मारहाण, श्रद्धा वालकर प्रकरणात पोलिसांची भूमिका, १०० कोटी वसुली, भर पत्रकार सभेत दिलेल्या शिव्या इ. या सर्व गोष्टी केवळ द्वेषाच्या राजकारणाचं प्रतीक आहेत.

महाराष्ट्राच्या जनतेला एकता टिकवून ठेवता आली नाही

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होऊ शकले नाही, त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला एकता टिकवून ठेवता आली नाही. त्यांनी आपल्या तीर्थरुपांचा वैचारिक वारसा त्यातून शरद पवार यांचा वैचारिक वारसा आत्मसात केला आहे किंवा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांनी शरद पवारांचे काही चांगले गुण आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढणारे व ठाकरे गटाकडून ज्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, संजय राऊत यांनी ज्यांना भर पत्रकार परिषदेत (चाय बिस्कुटांसमोर) शिव्या दिल्या असे धडाडीचे नेते किरीट सोमय्या यांनी शरद पवारांविषयी हल्लीच केलेलं विधान ठाकरे गटाने स्वतःच्या ह्रदयावर कोरुन ठेवले पाहिजे, जेणेकरुन राजकारण काय असतं याची पुसटशी कल्पना त्यांना येईल.

(हेही वाचा रुपाली ठोंबरे पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी इच्छूक; तृप्ती देसाई म्हणतात शिवराळ कार्यकर्ती)

महाराष्ट्राच्या जनतेला एकता टिकवून ठेवता आली नाही

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अनेक चांगले गुण आहेत. त्यातील अनेक गुण मी घेतले आहेत. पवार साहेबांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.” असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे. गिरीश बापट यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे ते पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात दाखल असताना किरीट सोमय्या त्यांच्या भेटीस गेले होते व शरद पवार देखील आपले राजकीय मतभेद विसरून बापटांना भेटायला गेले होते. “”शरद पवार यांचे एक वेगळे स्थान आहे. आम्ही त्यांचा नेहमीच आदर करतो. प्रत्येक राजकारणी अनेक चांगली कामं करत असतो. शरद पवारांनी देखील अनेक चांगली कामं केली आहेत. पक्ष जरी वेगळा असला किंवा कट्टर विरोधक असले तरी शरद पवार हे गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं आहे. त्यांचा मानसन्मान सगळे करत असतात. ही महाराष्ट्राचीच नाही तर हिंदुस्थानाची संस्कृती आहे” असं सोमय्या म्हणाले.

राजकारणाची एक वेगळी संस्कृती

हा गुण ठाकरेंनी आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. कारण राजकारण डायलॉगबाजी, द्वेष, मारझोड यावर चालत नाही तर राजकारणाची एक वेगळी संस्कृती आहे. सावरकर म्हणायचे, विरोधक हे प्रतिस्पर्धी असतात, शत्रू नसतात. याचं भान ठाकरेंनी ठेवणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरे आता तरुण आहेत. त्यांना खूप मोठा राजकीय प्रवास करायचा आहे, अर्थात त्यांची इच्छा असेल तर. त्यामुळे पवार आजोबांसोबत काम करताना मित्र कसे कमवायचे आणि राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून गरज असताना एकमेकांसाठी कसं धावून जायचं हा गुण खरोखर शिकण्यासारखा आहे. आपल्याच विश्वात रमणारे ठाकरे हा गुण आत्मसात करतील का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.