Uddhav Thackeray यांना युती करायचीच नव्हती; कारण शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली; एकनाथ शिंदे गटाचा पलटवार

213

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपासोबत युती करायचीच नव्हती, कारण त्यांना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना ५ वर्षे मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती म्हणून त्यांनी युती तोडली, असा पलटवार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी केला.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘दिल्ली’ गाठणार; जागावाटपाचा तिढा सुटणार ?)

…तर उद्धव ठाकरे यांनी शपथ घेऊन सांगावे 

उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा २०१९च्या निवडणुकीच्या वेळीची आठवण काढत तुळजा भवानी देवीची शपथ घेऊन सांगतो की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटे बोलत आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी पुन्हा केला आहे. यावर शिवसेना शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांची शपथ खरी आहे. पण पहिली अडीच वर्षे भाजपा आणि नंतरची शिवसेना असे होते. पण त्यांना युती करायचीच नव्हती. शेवटच्या क्षणाला भाजपाने हे मान्य केले. हे खोटे आहे म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान संजय शिरसाट यांनी दिले.त्यांना भाजपासोबत जायचे नव्हते, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. प्रश्न नीतिमत्तेच्या असेल तर त्यांनी शपथपूर्वक सांगावे, असे शिरसाट म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.