वेळ आली तर स्वबळावर लढेन; मेळाव्यातून Uddhav Thackeray यांचा मित्रपक्षांना इशारा

56
वेळ आली तर स्वबळावर लढेन; मेळाव्यातून Uddhav Thackeray यांचा मित्रपक्षांना इशारा
वेळ आली तर स्वबळावर लढेन; मेळाव्यातून Uddhav Thackeray यांचा मित्रपक्षांना इशारा

येत्या काही दिवसात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मी मुंबई, संभाजीनगरमधील असंख्य कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोललो. सगळ्यांचे मत आहे की, आपण एकटं लढायला हवे. पण मला तुमची जिद्द बघायची आहे. तुमची तयारी बघायची आहे. ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून आधी बाहेर या, त्यामुळे ज्या क्षणाला माझी खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पण यावेळी सूड उगवला पाहिजे. तसेच तुम्ही शपथ घेऊन सूड उगवण्याचे वचन द्याल तर वेळ आल्यावर स्वबळावर, एकटं लढण्याचा निर्णय नक्की घेईन, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर शिवसेना उबाठा पक्षाच्या मेळाव्यात मित्रपक्षांना दिला.

( हेही वाचा : बाह्ययंत्रणेद्वारे Mechanized Cleaning Services ला कर्मचारी संघटनेचा तीव्र विरोध

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) या विधानामुळे मित्रपक्षात चिंतेच वातावरण आहे. कारण स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशाराच एकप्रकारे ठाकरे यांनी मित्रपक्षांना दिलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान उद्घव ठाकरे म्हणाले की, मुंबईकर एवढे निष्ठूर होऊ शकत नाही. मावळा कधीच शिवसेनेशी गद्दारी करू शकत नाही. दरवेळी आपण शहरात सभा घेतो. यावेळी उपनगरमध्ये घेतली. येण्याजाण्याची गैरसोय होते. अडचणीची जागा असून सर्व निष्ठांवत आले. तुम्हाला धन्यवाद देतो,असे ठाकरे म्हणाले.

तसेच पुढे ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, मी तुमच्या ताकदीवरच लढत आहे. वांद्र्यात गद्दाराचा मेळावा सुरू आहे. राजकारणातील बाटगे आहेत. गद्दारांना सांगतो तुम्ही करता काय. आज कदाचित तुम्ही जिंकला असं वाटत असेल. आज आम्ही हरलोत तरी जनता आमचं स्वागत करत आहे. गद्दार जिंकले असतील त्यांना जिंकवणारे अमित शाह (Amit Shah) आहे. यंत्रणा बेकायदेशीर वापरल्या. अमित शाह (Amit Shah) आहेत तोपर्यंत तुम्ही आहात. महापालिका होऊ द्या, तुमची काय वाट लागते ते पाहा. अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून वागणूक मिळत होती. आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. मंत्रीपद नाही मिळालं गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू. डोळ्यातूल आसू दिसू लागलेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

दरम्यान विधानसभेत आपण गाफिल राहिलो. त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्या काळात त्यांनी अपप्रचार केला. आपण हिंदुत्व सोडलं नाही. मला सांगा हिंदुत्व सोडलं असेल तर. मी चेंबूरच्या चिता कॅम्पमध्ये भाषण केलं. तिथे मुस्लिम होते. मी हिंदीत भाषण केलं. त्यांना म्हटलं मी हिंदुत्व सोडलं का. माझं हिंदुत्व (Hindutav)मान्य आहे का. तर ते हो म्हणाले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकीकडे हिंदूत्व (Hindutav) सोडले नसल्याचे सांगून मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला गोत्यात पाडल्याचे बोलले जात आहे. कारण ते दोन्ही पक्ष स्वत: ला सेक्युलर समजत असल्याची टीका त्यांच्यावर वारंवार केली जाते. (Uddhav Thackeray)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.